Good News : अखेर केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु ! होळीपुर्वीच मोदी सरकारचे कर्मचाऱ्यांना मोठी भेट !

Spread the love

अखेर केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना होळीपुर्वीच जुनी पेन्शन योजना लागु करुन , केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिलेली आहे . केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे .केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन ( OPS ) लागु करण्याची बऱ्याच दिवसांपासून मागणी होती . केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयांमुळे कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनचा मोठा लाभ मिळणार आहे .

केंद्र सरकारने जुनी पेन्शन योजना लागु केली असली तरी , ही योजना केंद्र सरकारने सरसकट लागु न करता काही केंद्रीय कर्मचाऱ्यांनाच लागु करण्यात आलेली आहे .श्रम मंत्रालयाच्या आदेशांनुसार दि.22 डिसेंबर 2003 रोजी किंवा त्यापुर्वी जाहीरात देण्यात आलेल्या पदांवर कार्यरत कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करण्यात आलेली आहे .

केंद्र सरकारने दि.22.12.2003 रोजी राष्ट्रीय पेन्शन योजना ( NPS ) प्रणाली अधिसुचित करण्यात आलेली होती .या कालावधीमधील कर्मचारी केंद्रीय सेवा नियम 1972 नुसार जुनी पेन्शन योजनचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरविण्यात आले आहे .तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन निवडीचा पर्याय उपलब्ध देण्यात आलेला आहे .दि.31.08.2023 पर्यंत जुनी पेन्शनचा पर्याय कर्मचाऱ्यांना निवडता येणार आहे .सदरचा निर्णय केंद्रीय सुरक्षा दल ( CRPF ) दलांमधील कर्मचाऱ्यांना सदरचा आदेश लागु असणार आहे .

या निर्णयामुळे राष्ट्रीय पेन्शन योजनेमधील कर्मचाऱ्यांचे योगदान कर्मचाऱ्यांच्या सामान्य भविष्य निर्वाह निधी मध्ये जमा करण्यात येईल .सदरच्या निर्णयांमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण दिसुन येत आहेत .

कर्मचारी विषयक / पदभरती / शासकीय योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment