Old Pension : जूनी पेन्शनबाबत देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले ! वाचा सविस्तर अपडेट !

Spread the love

राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करण्याकरीता चर्चेसाठी आवाहन केले आहे .चर्चेतुन मार्ग काढू संप करु नका असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत आहेत .जुनी पेन्शनवर तोडगा काढण्याकरीता राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्याचे वित्त सचिव , विविध कर्मचारी संघटना , विरोधी पक्षनेते या बैठकीस उपस्थित राहणार आहेत .

जुनी पेन्शन लागु न करण्याचाच देवेंद्र फडणवीस यांचा विचार –

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस जरी चर्चेतुन मार्ग काढू असे सांगत असले तरी पेन्शन लागु न करण्याचाच विचार त्यांचा विचार असल्याचे स्पष्ट होत आहे . कारण यावेळी त्यांनी स्पष्ट केले कि , राज्याचा कारभार सांभाळताना जबाबदारी झटकता येणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे .

यावेळी त्यांनी सांगितले कि , जुनी पेन्शन लागु करुन राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त भार टाकण्याचा कोणताही हेतु नसून सदर योजनेला पर्यायी पेन्शन योजनांची चाचपणी करण्यात येईल . जेणेकरुन राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त भारही पडणार नाही . व इतर सर्व घटकांतील बाबींवर अन्याय देखिल होणार नाही .

यावेळी त्यांनी अजितदादा वित्तमंत्री असताना , जुनी पेन्शन वर अभ्यास समिती तयार करुन जुनी पेन्शन लागु करता येणार नाही असे त्यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते . यामुळे विरोधी पक्षांने विद्यमान सरकारला जुनी पेन्शन लागु करण्याचे अट्टहास का करावे , त्यांची सत्ता असताना का लागु केली नाही ? असा सवाल उपस्थित केला आहे .यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना विद्यमान सरकार जुनी पेन्शन लागु करण्याच्या तयारीतच नाहीये हे स्पष्ट झाले आहे .

कर्मचारी विषयक / शासकीय पदभरती / शासकीय योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment