राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे संदर्भात अधिवेशनात घेण्यात आला मोठा निर्णय !

Spread the love

श्री राजेश राठोड ,श्री कपिल पाटील ,श्री किशोर दराडे , श्री किरण सरनाईक ,श्री अशोक उर्फ भाई जगताप ,श्री अभिजीत वंजारी, डॉक्टर वजाहत मिर्झा , श्री सतेज उर्फ बंटी पाटील डॉक्टर प्रज्ञा सातव ,श्री जयंत तासगावकर, यांनी पहिल्या अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करेल काय असा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला होता ,यावर राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी पुढीलप्रमाणे उत्तर दिले आहेत .

राज्यातील माहे नोव्हेंबर 2005 व त्यानंतरच्या कालावधीत सेवेत रुजू झालेल्या सर्व कर्मचारी व शिक्षक यांनाही राज्याचे आर्थिक स्थिती सुधारल्यास जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा विचार राज्य शासन करेल असे उत्तर मान्य उपमुख्यमंत्री यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दिले होते . हे खरे आहे का असा प्रश्न उपस्थित केला असता राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट नकार दिला आहे .

यामुळे राज्यातील सर्व शासकीय निमशासकीय कर्मचारी व अनुदानित शिक्षक यांना झारखंड राजस्थान छत्तीसगड प्रमाणे जुनी पेन्शन लागू करण्याबाबत विविध संघटनांकडून होणाऱ्या मागणीबाबत शासनाचा कोणताही विचार नसल्याने , सध्या जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही .

राज्य शासनाकडून राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यास स्पष्ट नकार दिल्याने राज्य कर्मचाऱ्यांचे मनामध्ये सरकार बद्दल मोठ्या प्रमाणात नाराजगी दिसून येत आहे .

कर्मचारी विषयक / भरती / योजना व ताज्या अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा

Leave a Comment