राज्य शासन सेवेतील तब्बल 18 लाख कर्मचारी उद्या दिनांक 14 मार्च 2023 रोजी बेमुदत संपावर जाणार आहेत , या अनुषंगाने आज दिनांक 13 मार्च 2023 रोजी राज्याचे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री राज्याचे मुख्य सचिव , वित्त विभागाचे सचिव , त्याचबरोबर विविध संघटनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न झाली आहे .
राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करणे बाबत अभ्यास समिती गठित करून यावर योग्य ती निर्णय घेण्यात येईल असे राज्य शासनाकडून सांगण्यात आले . सदरचा निर्णय बैठकीस उपस्थित संघटनेचे पदाधिकारी यांना मान्य न केल्याने आता उद्याचा संप अटळ असणार असल्याची माहिती समोर येत आहे .
संप मागे न घेतल्यास मेस्मा कायद्यानुसार कार्यवाही –
जर उद्या कर्मचाऱ्यांनी संप मागे न घेतल्यास संपामध्ये सहभागी कर्मचाऱ्यावर मेस्मा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यासाठी विधानसभा व विधान परिषदेमध्ये मेस्मा कायद्याचे विधेयक पारित करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे . गुन्हा दाखल झाल्यानंतर देखील कर्मचारी संप मागे घेणार नसल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे .
या बैठकीमध्ये स्पष्ट असा कोणताही निर्णय न घेतल्याने उद्या दिनांक 14 मार्च 2023 पासून राज्यातील तब्बल 18 लाख शासकीय ,निमशासकीय ,शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत.
तसेच उद्या बोर्डाची परीक्षा आहे , परीक्षा घेण्यास कर्मचाऱ्यांकडून विरोध दर्शविला जात आहे .त्याचबरोबर बोर्डाचे पेपर तपासणीसाठी देखील विरोध दर्शविला जात आहे .यामुळे आता उद्या पर्यंत योग्य तो तोडगा राज्य शासनाला घ्यावाच लागणार आहे .
कर्मचारी विषयक, शासकीय भरती / योजना व ताज्या अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा
- Employee Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात येणार !
- Employee Shasan Nirnay : राज्य कर्मचाऱ्यांसाठी दोन महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित , पाहा सविस्तर शासन निर्णय !
- Old Pension : राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत न्यायालयाने राज्य सरकारला दिले निर्देश !
- एलआयसीच्या जीवन लाभ योजनेमध्ये फक्त 253 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा 54 लाख रुपयांचा परतावा!
- वेतन , अतिकालिक भत्ता , महागाई भत्ता व वेतनावरील बाबींकरीता अनुदान वितरीत करणेबाबत शासन निर्णय निर्गमित !