महिला कर्मचाऱ्यांना बालसंगोपनासाठी विशेष रजा देण्यात येते आता ही रजा पुरुष कर्मचाऱ्यांना देखील मिळणार आहे .अशी तरतूद हरयाणा राज्य सरकारने कर्मचारी रजा नियमावली मध्ये करण्यात आलेले आहे .
हरियाणा राज्य कर्मचाऱ्यांना संपूर्ण सेवा कार्यकाळामध्ये 730 दिवसांची रजा मिळणार आहे . ही रजा बालसंगोपनासाठी देण्यात येणार असून , यासंबंधीचा निर्णय हरियाणा राज्य सरकारने सन 2022 मध्येच घेतला होता , परंतु या संबंधाचे अधिकृत अधिसूचना दिनांक 23 फेब्रुवारी 2023 पासून लागू करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .
यापूर्वी बालसंगोपनाची रजा केवळ महिला कर्मचाऱ्यांना देण्यात येत होती .परंतु आता पुरुष कर्मचाऱ्यांना देखील दोन वर्षांची बालसंगोपन रजा मिळणार आहे . या रजेसाठी खालील निकष पूर्ण करणारे पुरुष कर्मचारी पात्र ठरणार आहेत .
यामध्ये विधुर , घटस्फोटीत असलेल्या एकल पुरुष सरकारी कर्मचाऱ्यांना बालसंगोपन रजेचा लाभ मिळणार आहे . त्याचबरोबर मूल दिव्यांग असल्यास सक्षम आरोग्य अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र असतील अशा प्रकरणी , त्याचबरोबर 40% अशक्तता अथवा दिव्यांग मुलांसाठीही या रजेचा लाभ घेता येईल . याकरिता कोणत्याही वयाची अट असणार नाही , परंतु अधिसूचनेनुसार 18 वर्षापर्यंतच्या वयाच्या दोन मुलांच्या संगोपनासाठीच ही रजा मिळू शकणार आहे .
कर्मचारी विषयक / शासकीय पदभरती /शासकीय योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट साठी व्हाट्सएप ग्रुप मध्ये सामील व्हा .
- Employee Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात येणार !
- Employee Shasan Nirnay : राज्य कर्मचाऱ्यांसाठी दोन महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित , पाहा सविस्तर शासन निर्णय !
- Old Pension : राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत न्यायालयाने राज्य सरकारला दिले निर्देश !
- एलआयसीच्या जीवन लाभ योजनेमध्ये फक्त 253 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा 54 लाख रुपयांचा परतावा!
- वेतन , अतिकालिक भत्ता , महागाई भत्ता व वेतनावरील बाबींकरीता अनुदान वितरीत करणेबाबत शासन निर्णय निर्गमित !