राज्य कर्मचाऱ्यांचे दिनांक 14 मार्च 2023 ते दिनांक 20 मार्च 2023 या कालावधीत संपामध्ये सहभागी कर्मचाऱ्यांच्या सेवा खंड न करता असाधारण रजा मंजूर करून कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्याबाबत दिनांक 28 मार्च 2023 रोजी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
असाधारण रजेचे नियम महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम 1981 नुसार असाधारण रजा म्हणजेच कोणत्याही प्रकारची रजा अनुज्ञेय नसेल , किंवा इतर प्रकारच्या रजा अनुज्ञेय असताना देखील स्पष्टपणे असाधारण रजेची मागणी केली असेल तरच ही रजा मंजूर करता येत असते .
नियमित सेवेतील कर्मचाऱ्यांना ही रजा पाच वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी मंजूर करता येत असते , तर अस्थायी कर्मचाऱ्यांना काही मर्यादेमध्ये , यामध्ये वैद्यकीय प्रमाणपत्रा शिवाय तीन महिन्यापर्यंत , त्याचबरोबर तीन वर्षांच्या सेवेनंतर वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे सहा महिन्यापर्यंत मंजूर करता येते .
त्याचबरोबर पाच वर्षांच्या सेवेनंतर वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे बारा महिन्यापर्यंत तर एक वर्षाच्या सेवेनंतर कर्करोग मानसिक रोग इत्यादी आजाराकरिता बारा महिन्यापर्यंत असाधारण रजा घेता येत असते , एक वर्षाच्या सेवेनंतर क्षयरोग, कुष्ठरोग यासाठी 18 महिन्यापर्यंत ही रजा घेता येत असते .
असाधारण रजेच्या कालावधीमधील रजा वेतन
असाधारण रजेच्या कालावधीमध्ये , कर्मचाऱ्यांना वेतन व महागाई भत्ता अनुज्ञेय असणार नाही , परंतु रजेवर जाण्यापूर्वी ज्या दराने HRA , त्याचबरोबर स्थानिक पूरक भत्ता दिला जात होता , ते मात्र घरभाडे खर्चावर मुख्यालयात कर्मचारी खर्च करतोय असे प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच सदर भत्ता अनुज्ञेय करण्यात येईल .
कर्मचारी विषयक , भरती / योजना व ताज्या अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा !

- Employee Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात येणार !
- Employee Shasan Nirnay : राज्य कर्मचाऱ्यांसाठी दोन महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित , पाहा सविस्तर शासन निर्णय !
- Old Pension : राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत न्यायालयाने राज्य सरकारला दिले निर्देश !
- एलआयसीच्या जीवन लाभ योजनेमध्ये फक्त 253 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा 54 लाख रुपयांचा परतावा!
- वेतन , अतिकालिक भत्ता , महागाई भत्ता व वेतनावरील बाबींकरीता अनुदान वितरीत करणेबाबत शासन निर्णय निर्गमित !