Good News : राज्य कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार वाढीव 4% महागाई भत्ता (DA) चा लाभ !

Spread the love

राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे संदर्भात आज रोजी झालेल्या बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय घेण्यात आला असून , या संदर्भात दि.21 मार्च 2023 रोजी विधिमंडळामध्ये शासन कार्यकारणी अहवाल सादर करण्यात येणार आहे .

राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता लाभ अनुज्ञेय करण्यासंदर्भातील मागणी संपामध्ये नमूद करण्यात आलेली होती , त्या अनुषंगाने राज्य कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासून वाढीव चार टक्के महागाई भत्ता लागू करणे अद्याप पर्यंत बाकी आहे . सदरचा जानेवारी 2023 चा वाढीव चार टक्के महागाई भत्ता राज्य कर्मचाऱ्यांना लवकरच लागु करण्यात येणार येईल , ज्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा एकूण DA हा 38% वरून 42% होणार आहे .

मीडिया रिपोर्टनुसार या संदर्भात वित्त विभागाकडून सविस्तर विधेयक तयार करण्यात आलेले असून . DA वाढीबाबतचा अधिकृत शासन निर्णय मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निर्गमित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे .यामुळे कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनसह वाढीव चार टक्के महागाई भत्याचा लाभ अनुज्ञेय होणार आहे .

कर्मचारी विषयक भरती योजना व ताजा अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा

Leave a Comment