महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023 : राज्य कर्मचाऱ्यांना बाबतीत घेण्यात आले हे मोठे महत्वपुर्ण निर्णय ! अर्थसंकल्पामध्ये विशेष निधींची तरतुद !

Spread the love

महाराष्ट्र राज्याचे सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरीताचे अर्थसंकल्प दि.09.03.2023 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्तमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी मांडले . यामध्ये राज्यातील सर्वच बाबींवर लक्ष देवून आवश्यक निधींची तरतुद करण्यात आलेली आहे . यामध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांना देखिल विशेष तरतुद करण्यात आलेली आहे .

यामध्ये राज्य शासन सेवेतील शिक्षण सेवकांच्या मानधनांमध्ये सरासरी 10 हजार रुपये वाढ करण्याकरीता अर्थसंकल्पामध्ये विशेष निधींची तरतुद करण्यात आलेली आहे .यामध्ये प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षणसेवकांचे मानधन 6 हजार रुपयांवरुन 16 हजार रुपये करण्यात आले तर माध्यमिक शिक्षण सेवकांचे मानधन 8 हजार रुपयांवरुन 18 हजार रुपये करण्यात आले आहे तर उच्च माध्यमिक शिक्षण शिक्षण सेवकांचे मानधन 9 हजार रुपयांवरुन 20 हजार रुपये करण्यात आले आहे . याकरीता पुढील पाच वर्षांसाठी 1534 कोटी रुपयांची तरतुद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे .

त्याचबरोबर राज्य शासन सेवेतील अशा स्वयंसेविका , अंगणवाडी सेविकांच्या मानधनामध्ये भरीव वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे . आशा स्वयंसेविकांचे मानधन 3500/- वरुन 5000/- रुपये करण्यता आले आहे तर गटप्रवर्तकांचे मानधन 4700/- वरुन 6200/- रुपये करण्यात आले आहे .

तर अंगणवाडी सेविकांचे मानधन 8,325 रुपये वरुन 10,000/- करण्यात आले आहे . तर मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5975/- वरुन 7,200/- रुपये करण्यात आले आहे . तर अंगणवाडी मदतनिसांचे मानधन 4,425/- वरुन 5,500/- रुपये करण्यात आले आहे . अंगणवाडी , मिनी अंगणवाडी सेविका तसेच मदतनिसांचे तब्बल 20,000 पदे भरण्यात येणार आहे . तसेच अंगणवाड्यांमार्फत घरपोच आहार पुरवठ्यासाठी साखळी व्यवस्थापन प्रणालींचा अवलंब करण्यात येणार आहे .

नोकरदार महिला कर्मचाऱ्यांसाठी केंद्राच्या मदतीने 50 वसतिगृहे , निराधार व निराश्रित महिलांसाठी नविन 50 शक्ती सदन , निर्माण करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे .कर्मचाऱ्यांच्या अशा वरील बाबींकरीता अर्थसंकल्पांमध्ये निधींची तरतुद करण्यात आलेली आहे .

कर्मचारी विषयक , पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा .

Leave a Comment