LIC च्या या नावीन्यपूर्ण योजनेत गुंतवणूक करून मिळवा जास्तीत जास्त परतावा!

Spread the love

मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की, एलआयसी ही एक देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असून ही विमा कंपनी विविध पॉलिसी व विविध योजना नागरिकांकरिता राबत असते. जनतेचा सुद्धा एलआयसीच्या विविध योजनांवर तितकाच विश्वास आहे. त्या विश्वासाने सर्व नागरिक या योजनेमध्ये गुंतवणूक करत आहेत. कारण गुंतवणुकी वर तितकाच लाभ एलआयसीच्या पॉलिसीच्या माध्यमातून नागरिकांना मिळत आहे.

आता नवीन एक योजना राबवली असून त्या योजनेचे नाव आहे धनसंचय पॉलिसी. एलआयसी ने राबवलेली ही पॉलिसी वैयक्तिक यासोबतच बचत जीवन विमा पॉलिसीच्या श्रेणीमध्ये मोडत आहे. या पॉलिसीमध्ये विमा सोबत बचत सुद्धा तितकीच होते…

एलआयसी विमा कंपनीने राबवलेल्या धनसंचय पॉलिसीच्या माध्यमातून खात्रीशीर परतावा नागरिकांना मिळत आहे. त्यामुळे नागरिक या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यास अजिबात मागे पुढे बघत नाहीत. या योजनेमध्ये गुंतवणूक करण्याचा कालावधी हा कमीत कमी पाच वर्षे असून जास्तीत जास्त पंधरा वर्षे निश्चित केला आहे. या विमा योजनेच्या माध्यमातून नागरिकांना विविध प्रकारचे फायदे मिळत आहेत.

जर एखाद्या पॉलिसीधारक व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर एलआयसीच्या या पॉलिसीच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबाला वित्तीय सहाय्यता दिली जाते. मृत्यू झाल्यानंतर एक रकमे किंवा हप्त्याप्याने जी काही रक्कम असेल ते नागरिकांच्या कुटुंबाला देण्यात येते.

मागील काही दिवसांपूर्वीच नव्याने ही धनसंचय योजना एलआयसी ने देशभरामध्ये राबवली असून ही योजना राबवली नंतर जास्तीत जास्त रिस्पॉन्स या योजनेला गुंतवणूकदाराने दिला. योजनेच्या माध्यमातून चांगला परतवा मिळत असल्याने गुंतवणूकदारांनी पुढे मागे न बघता या योजनेमध्ये गुंतवणूक केली.

मित्रांनो एलआयसीच्या ह्या महत्वकांक्षा योजनेबद्दल आणखी सविस्तर माहिती घ्यायची असेल तर आपल्या जवळील एलआयसीच्या शाखेमध्ये भेट द्या किंवा जे कोणी एलआयसीचे एजंट आपल्या आसपास असतील त्यांना भेटून याविषयी संपूर्ण माहिती मिळवा आणि योजनेमध्ये गुंतवणूक करून आपली आर्थिक बाजू बळकट करा…

Leave a Comment