सरकारकडून महिला वर्गासाठी नवनवीन योजना राबविण्यात येतात , यातच मध्यप्रदेश राज्य सरकारने जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून ‘ लाडली बहन योजना ‘ सुरू केली आहे . या योजनेनुसार महिलांना प्रति महा 1000 रुपये तर प्रतिवर्षी 12,000/- रुपये मिळणार आहेत .
या योजनेच्या मुख्य उद्देश म्हणजे महिलांना सशक्त आणि मजबूत बनवण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे . जेणेकरून महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करता येईल व दरमहा घर चालवण्यासाठी एक हजार रुपये महिलांच्या थेट बँक खात्यामध्ये वर्ग केले जाणार आहे .
या योजनेचा लाभ घेण्यासाठी निकष
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा मध्य प्रदेश राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे . सदर महिला लाभार्थ्याचे वय 23 वर्षापेक्षा कमी आणि साठ वर्षापेक्षा अधिक नसणे आवश्यक आहे . त्याचबरोबर शाळा किंवा महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या महिला लाभार्थ्यांना या योजनेतून लाभ घेता येणार नाही . ही योजना केवळ इतर मागास प्रवर्ग अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या प्रवर्गातीलच महिलांसाठी सुरू करण्यात आलेली आहे .
या योजनेची सुरुवात जागतिक महिला दिनापासूनच सुरुवात करण्यात येणार असून पहिला हप्ता 10 जून रोजी महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येणार आहेत .
आवश्यक कागदपत्रे – या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराकडे आधार कार्ड पासपोर्ट साईज फोटो बँक खात्याची डिटेल्स मोबाईल नंबर रहिवासी दाखला जन्म दाखला इत्यादी कागदपत्रे असणे आवश्यक आहे .
- Employee Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात येणार !
- Employee Shasan Nirnay : राज्य कर्मचाऱ्यांसाठी दोन महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित , पाहा सविस्तर शासन निर्णय !
- Old Pension : राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत न्यायालयाने राज्य सरकारला दिले निर्देश !
- एलआयसीच्या जीवन लाभ योजनेमध्ये फक्त 253 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा 54 लाख रुपयांचा परतावा!
- वेतन , अतिकालिक भत्ता , महागाई भत्ता व वेतनावरील बाबींकरीता अनुदान वितरीत करणेबाबत शासन निर्णय निर्गमित !