राज्य कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता व पगारही बंद करा या आमदाराची विधिमंडळात मागणी !

Spread the love

राज्य शासन सेवेतील ग्रामीण भागामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना वास्तव्यासाठी घर भाडे भत्ता देण्यात येतो , अनेक कर्मचारी कामाच्या ठिकाणी वास्तव्यास न राहता शहरी भागामध्ये राहून घर भाडे भत्ता व इतर भत्त्यांचा लाभ घेत असतात . अशा कर्मचाऱ्यांचा तात्काळ घरभाडे भत्ता बंद करण्यात यावा . त्याचबरोबर पगारही कपात करण्यात यावी अशी प्रमुख मागणी आमदार प्रशांत बंब यांनी विधिमंडळात केली .

दरवर्षी राज्य कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता अदा करण्यासाठी 2,000 कोटी रुपये इतका निधी लागत असतो . ग्रामीण भागामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणीच वास्तव्य करण्यासाठी घरभाडे भत्ता देण्यात येतो .मात्र अनेक कर्मचारी कामाच्या ठिकाणी न राहता घरभाडे भत्ता चा लाभ घेत असल्याचे सांगत आमदार प्रशांत बंब यांनी विधिमंडळात थेट राज्य कर्मचारी फुकट घरबाडे भत्ता घेत असल्याचे बोचक टीका राज्य कर्मचाऱ्यांवर केली .

राज्यातील शिक्षक , ग्रामसेवक , तसेच तलाठी ,आरोग्य सेवक इ. कर्मचाऱ्यांना ग्रामीण भागातील विकासासाठी घरभाडे भत्ता अदा केला जातो . जर सदर कर्मचारी कामाच्या ठिकाणी राहत नसतील अशा कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता कपात करणेबाबत राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आली असल्याची बाब यावेळी प्रशांत बंब यांनी यावेळी स्पष्ट केली .

त्याचबरोबर आतापर्यंत ज्या कर्मचाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी वास्तव न करता घरभाडे भत्ता चा लाभ घेतला आहे अशा कर्मचाऱ्यांकडून सदर भत्त्याची वसुली करण्यात यावी अशी ही मागणी यावेळी करण्यात आली .

कर्मचारी विषयक , पदभरती /योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीत whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा

Leave a Comment