शेतजमीन नाही म्हणून चिंता नका ! आत्ता ही बँक देणार आहेत शेत खरेदी करण्यासाठी 80% कर्ज !

Spread the love

Agriculture Scheme : शेतकऱ्यांची खरी ओळख ही त्यांचा शेत जमिनीवरून ठरत असते. आपल्या देशात बहुतांशी शेतकऱ्यांकडे खूपच कमी शेत जमीन आहे तर काहीना जमीनच नाही म्हणजे त्यांच्याकडे शेती कसण्यासाठी शेतजमीन नाही ते दुसऱ्यांची शेती एकतर भाडेतत्त्वाने घेऊन शेती करतात किंवा शेतमजूर म्हणून काम करत असतात.

अनेक भूमिहीन तसेच अल्पभूधारक शेतकरी बांधवांना शेतजमीन विकत घ्यायची असते परंतु शेतजमीन विकत घेणे म्हणजे काही सोपे काम राहिलेले नाही. शेतजमीन विकत घेण्यासाठी लाखो रुपयांचा निधी लागतो.

अशा परिस्थितीत अल्पभूधारक आणि भूमीहीन पैस्या अभावी शेती करण्याची इच्छा असताना देखील शेत जमीन खरेदी करू शकत नाहीत. परंतु आता स्टेट बँक ऑफ इंडिया ने अशी एक योजना आणली आहे ज्याच्या मदतीने अल्पभूधारक आणि भूमिहीन शेतकरी शेतजमीन विकत घेऊ शकणार आहेत. खरं पाहता एसबीआय ने लँड परचेस स्कीम अर्थात शेतजमीन खरेदी योजना आणली आहे ज्याच्या मध्यातून शेत जमीन खरेदी करण्यासाठी 85 % कर्ज उपलब्ध करून दिला जाणार आहे. चला तर मग जाणून घेऊया या योजनेविषयी सर्व माहिती.

लँड परचेस स्कीमचा उद्देश नेमका काय काय आहेत

एसबीआयच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली शेतजमीन खरेदी योजनेचा अल्पभूधारक आणि अत्यल्प भूधारक तसेच ज्यांच्याकडे शेतजमीनच नाही म्हणजेच भूमिहीन लोकांना तसेच शेतकऱ्यांनां शेत जमीन खरेदी करण्यास मदत करणे हा याचा मुख्य हेतू आहे.

जमीन खरेदी करण्यासाठी किती % परेंत लोन मिळतं?

एका मीडिया रिपोर्ट नुसार, एसबीआयच्या माध्यमातून शेत जमीन खरेदी करण्यासाठी जमिनीच्या मूल्यानुसार 85% पर्यंतच कर्ज आपल्याला प्राप्त होत. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी ती म्हणजे कर्ज घेतल्यानंतर एक ते दोन वर्षात कर्जाची परतफेड सुरू होत असते आणि शेत जमीन जर आधीच विकसित असेल तर एका वर्षात कर्जाची परतफेड सुरू होते असते.

जर शेतजमीन विकसित करायचे असेल तर दोन वर्षानंतर कर्ज परतफेडीला सुरुवात ही होते असते. कर्जदार शेतकऱ्याला सात ते दहा वर्षात सदर कर्जाची परतफेड करावी लागते. जोपर्यंत संपूर्ण कर्ज फिटत नाही तोपर्यंत जमीन ही बँकेकडे गहाण स्वरूपात असते. ज्यावेळी कर्ज फिटेल त्यावेळी बँकेकडून ही जमीन मुक्त केली जाते व शेतकऱ्याला दिली जाते.

कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार जमीन खरेदी करण्यासाठी लोन जाणून घ्या पात्रता?

जसं की आपण आधीच बघितलं ही योजना अल्प आणि अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आहे म्हणजेच पाच एकर पेक्षा कमी शेत जमीन असलेले शेतकरी या SBI योजनेअंतर्गत कर्ज मिळवू शकणार आहेत.

अडीच एकर पेक्षा कमी बागायती शेत जमीन असलेले शेतकरी देखील या एसबीआयच्या योजनेतून कर्ज घेऊ शकणार आहेत.

विशेष म्हणजे जे भूमिहीन आहेत म्हणजे ज्यांच्याकडे आधीच शेतजमीन नाही असे देखील लोक या योजनेचा लाभ घेऊन आपलं बागायतदार बनण्याचं स्वप्न पूर्ण करू शकणार आहेत.

या ठिकाणी मात्र ज्या लोकांना शेतकऱ्यांना कर्ज घ्यायच आहे त्यांचे कर्ज फेडीचे जुने रेकॉर्ड क्लिअर असणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणजेच सिबिल स्ट्रॉंग राहणं सुध्दा गरजेचं आहे.

सगळ्यात महत्त्वाचं ज्या व्यक्तीला या योजनेअंतर्गत कर्ज घ्यायचे आहे त्यावर इतर कोणत्याही बँकेचे थकीत नसावे.

Leave a Comment