राज्य कर्मचाऱ्यांने दिनांक 14 मार्च 2023 पासून पुकारलेले संप बेकायदेशीर असून , या संपामुळे नागरिकांना, विद्यार्थी , रुग्ण यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे . यामुळे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावतीने , उच्च न्यायालय मध्ये कर्मचारी संपाविरुद्ध याचिका दाखल करण्यात आलेली आहे .
कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला आज दिनांक 16 मार्च 2023 रोजी तिसरा दिवस असून , अद्याप पर्यंत राज्य शासनाकडून कोणताही सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला नसल्याने , राज्य कर्मचाऱ्यांकडून संप कायम ठेवला जाणार असल्याची बातमी समोर आली आहे . संपामध्ये दिनांक 28 मार्च 2023 पासून राजपत्रित अधिकारी देखील सक्रिय सहभाग घेणार असल्याने संपाची तीव्रता अधिकच वाढणार आहे .
सदरचा संप हा बेकायदेशीर असून , संपामुळे नागरिकांचे होणारे हाल लक्षात घेऊन संपाबाबत तात्काळ निर्णय होण्याची मागणी गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून करण्यात आली आहे . यामुळे पुढील दोन दिवसांमध्ये संपाबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे .
राज्य कर्मचारी राज्य शासनाला अगोदरच संपाविषयी नोटीस देऊन संपामध्ये सहभागी झाल्याने , शिवाय हा संप राज्यव्यापी असल्याने उच्च न्यायालय मध्ये कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता आहे . राज्य शासनाकडून कोणताही तोडगा काढला जात नसल्याने संप लांबणीवर पडत आहे
कर्मचारी विषयक, भरती / योजना व ताज्या अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा
- Employee Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात येणार !
- Employee Shasan Nirnay : राज्य कर्मचाऱ्यांसाठी दोन महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित , पाहा सविस्तर शासन निर्णय !
- Old Pension : राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत न्यायालयाने राज्य सरकारला दिले निर्देश !
- एलआयसीच्या जीवन लाभ योजनेमध्ये फक्त 253 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा 54 लाख रुपयांचा परतावा!
- वेतन , अतिकालिक भत्ता , महागाई भत्ता व वेतनावरील बाबींकरीता अनुदान वितरीत करणेबाबत शासन निर्णय निर्गमित !