संपाचा तिसरा दिवस : राज्य कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत आजची मोठी महत्वाची बातमी : जाणून घ्या सविस्तर अपडेट !

Spread the love

राज्य कर्मचाऱ्यांचा आज संपाचा तिसरा दिवस असून , राज्य शासनाकडून अद्याप जुनी पेन्शन बाबत ठोस निर्णय न घेतल्याने संप कायम असणार आहे . या संपामध्ये आता राज्यातील राजपत्रित अधिकारी सक्रिय सहभाग घेणार आहेत . या संदर्भात महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाकडून आज दिनांक 16 मार्च 2023 रोजी महत्त्वपूर्ण पत्रक निर्गमित झालेले आहे .

जे कर्मचारी संपावर गेले आहेत , अशा कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची व गैरवर्तणूकची नोटीस देण्याचे राज्य शासनाने आदेश दिलेले आहे . परंतु आता राज्यातील राजपत्रित अधिकारीच संपामध्ये सहभाग घेणार असल्याने कोणत्याही कर्मचाऱ्यावर कार्यवाही होणार नाही . यामुळे संपामध्ये सहभागी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे .

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाकडून निर्गमित झालेल्या पत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की , जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी सरकारी – निमसरकारी शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या दिनांक 14 मार्च 2023 पासून च्या बेमुदत संप आंदोलनास अधिकारी महासंघाचा संपूर्ण पाठिंबा असून , दिनांक 28 मार्च 2023 पासून राज्यभरातील सर्व अधिकारी देखील या आंदोलनात सक्रिय सहभागी होतील . असा निर्णय अधिकारी महासंघाच्या राज्य कार्यकारिणीने घेतला आहे . आंदोलनामध्ये सक्रिय सहभागाची नोटीस दिनांक 13 मार्च 2023 रोजीच राज्य शासनास महासंघाकडून देण्यात आली आहे .

राज्यातील राजपत्रित अधिकारी संपामध्ये सक्रिय सहभाग घेणार असल्याने , राज्य शासनाला जुनी पेन्शन लवकरच लागू करावी लागणार आहे . कारण राजपत्रित अधिकारी संपावर गेल्यास संपूर्ण प्रशासन व्यवस्था पूर्णपणे ठप्प होऊन जाईल .

कर्मचारी विषयक , भरती /योजना व ताज्या अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा

Leave a Comment