Employee Strike : जुनी पेन्शन संपातून या कर्मचाऱ्यांनी घेतली माघार !फडणवीस यांना पत्र ; परंतु …

Spread the love

राज्यातील शासकीय – निमशासकीय त्याचबरोबर सार्वजनिक उपक्रम अंतर्गत येणारे कर्मचारी यांचा तिसऱ्या दिवशीही संप सुरूच आहे . या संपातून राज्यातील महानगरपालिका , नगरपालिका, नगरपरिषद कर्मचारी यांनी राज्यव्यापी बेमुद संपातून अखेर माघार घेतली आहे . आज दिनांक 16 मार्च 2023 पासून हे कर्मचारी कामावर हजर असणार आहेत.

परंतु या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपास जाहीर पाठिंबा असणार आहे , आज दिनांक 16 मार्च 2023 पासून राज्यातील महानगरपालिका ,नगरपरिषदा , नगरपालिका यामधील कार्यरत अधिकारी / कर्मचारी कामावर हजर असणार आहेत . याबाबतचे अधिकृत पत्र संघटनेचे अध्यक्ष शशिकांत हिंजुडे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केली आहे .

कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन बाबत सकारात्मक तोडगा काढावा जेणेकरून कर्मचाऱ्यांना संप मागे घेता येईल , अशी विनंती यावेळी संघटनेचे अध्यक्ष हिंजुडे यांनी फडणीस यांना पत्र लिहून पाठवले आहे . सध्या संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आकडा 19 लाख पेक्षाही अधिक गेल्याची माहिती समोर आली आहे .

कर्मचाऱ्यांना सन्मान जनक पेन्शन लागू करण्यास काही हरकत नाही , परंतु 1982- 83 ची जुनी पेन्शन लागू केल्यास सन 2030 ते 35 या काळामध्ये सरकारचे निश्चितच दायित्व 85% पेक्षाही अधिक जाईल . अशी भीती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी विधानसभेत काल मांडली आहे . यामुळे राज्य शासनाकडून जुनी पेन्शनवर सध्या तोडगा नाही असे दिसून येत आहे .

यामुळे राज्यातील शासकीय / निमशासकीय कर्मचाऱ्यांनी सलग तिसऱ्याही दिवशी संप चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . या संपातून पालिका प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी नागरिकांची गैरसोय होऊ नये , यामुळे कामावर हजर राहून शासनाचा निषेध नोंदवण्याचा निर्णय घेतला आहे . या कर्मचाऱ्यांचा संपात संपूर्ण पाठिंबा असणार असल्याची माहिती पालिका प्रशासन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष झिंजुडे यांनी दिली आहे .

कर्मचारी विषयक , भरती / योजना व ताज्या अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा

Leave a Comment