सरकारी कर्मचाऱ्यांना 42% दराने वाढीव महागाई भत्ता देणेबाबत वित्त विभागाकडून कार्यवाही !

Spread the love

सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षांमधून दोन वेळा महागाई भत्ता ( DA ) वाढीचा लाभ मिळत असतो . माहे जानेवारी व जुलै अशा दोनदा डी.ए वाढ करण्यात येत असते , जानेवारी 2023 मधील डी.ए वाढ कर्मचाऱ्यांना बाकी होती . यावर केंद्र सरकारने अखेचा शिक्कामोर्तब केला आहे . यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची गोड बातमी समोर आलेली आहे .

4 टक्के डी.ए वाढ – सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2022 पासून 38 टक्के प्रमाणे डी.ए लाभ मिळत होता . यामध्ये आता माहे जानेवारी 2023 पासून आणखीण 4 टक्के वाढ करण्यात येणार आहे . ज्यामुळे कर्मचाऱ्यांना एकुण डी.ए 42% प्रमाणे अनुज्ञेय होणार आहे . याबाबत केंद्रीय वित्त विभागाकडून 4% डी.ए वाढीची कार्यवाही करण्यात आलेली आहे .

या संदर्भातील अधिकृत्त निर्णय ( OS ) मार्च महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यात निर्गमित होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे .डी.ए वाढीमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये मोठी वाढ होणार होणार आहे .

केंद्र सरकारच्या निर्णयानंतर महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना देखिल लगेचच डी.ए वाढ लागु करण्यात येणार आहे . तशा पद्धतीने राज्य शासनांच्या वित्त विभागाकडून कार्यवाही करण्यात आलेली आहे . परंतु सध्या राज्य कर्मचाऱ्यांचे संप सुरु असल्याने डी.ए वाढीचा निर्णय लांबणीवर जाण्याची मोठी शक्यता आहे .

कर्मचारी विषयक , शासकीय पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment