राज्य कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी उभारलेला लढ्याला अनेकांकडून विरोध दर्शविला जात आहे .अनेकजण कर्मचाऱ्यांनी उभारलेला संपाला विरोध करत आहेत . हेच नाही तर बस महामंडळ कर्मचाऱ्यांनी उभारलेल्या संपाला आधार देणारे वकिल गुणरत्न सदावर्ते हेच आता राज्य कर्मचाऱ्यांनी उभारलेल्या जुनी पेन्शन संपाला विरोध करत आहेत .
जुनी पेन्शन थांबवा , महाराष्ट्र वाचवा – राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु केल्यास , राज्य सरकारच्या तिजोरीवर मोठ्या प्रमाणात आर्थिक भार येईल .असे राज्याचे उपमुख्यमंत्री वारंवार विधानसभेत सांगत आहेत .यामुळे जिल्हा कोल्हापुर येथे तरुणांनी आयोजित करण्यात आलेला भव्य मोर्चाचे सुत्रधार नेमका कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे .
सुशिक्षित बेरोजगार युवक / युवतींनी या भव्य मोर्चाचे आयोजनक केले असून , जुनी पेन्शन थांबवा महाराष्ट्र वाचवा असे या मोर्चाचे उद्दिष्ट्ये असणार आहे .तसेच या मोर्चाच्या प्रसिद्धीपत्रकांमध्ये नमुद करण्यात आलेले आहे कि , आम्ही तयार आहोत अर्ध्या पगारावर काम करायला ते ही विना पेन्शन असे यामध्ये नमुद करण्यात आलेले आहेत .
जुनी पेन्शन योजना थांबवून महाराष्ट्र राज्याला आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री जिल्हाधिकारी यांना निवदेन देण्यासाठी शुक्रवार दि.17.03.2023 वेळ सकाळी 11 वाजता दसरा चौक चौक कोल्हापुर येथून जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहेत .

राज्यातील कर्मचाऱ्यांचा संप मोडित काढण्यासाठी अशा प्रकारचे कृत्य नेमका कोण करत आहे , यामागे कुणाचे हात आहे . असा प्रश्न कर्मचाऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहेत .
कर्मचारी विषयक , पदभरती योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रूपमध्ये सामिल व्हा
- Employee Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात येणार !
- Employee Shasan Nirnay : राज्य कर्मचाऱ्यांसाठी दोन महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित , पाहा सविस्तर शासन निर्णय !
- Old Pension : राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत न्यायालयाने राज्य सरकारला दिले निर्देश !
- एलआयसीच्या जीवन लाभ योजनेमध्ये फक्त 253 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा 54 लाख रुपयांचा परतावा!
- वेतन , अतिकालिक भत्ता , महागाई भत्ता व वेतनावरील बाबींकरीता अनुदान वितरीत करणेबाबत शासन निर्णय निर्गमित !