New Pay Commission ||आठव्या वेतन आयोगाची सरकारी कर्मचाऱ्यांना लागली चाहूल ! पगारामध्ये होणार दुप्पट वाढ !

Spread the love

सरकारी कर्मचाऱ्यांना नव्या वेतन आयोगाची म्हणजेच आठवा वेतन आयोगाची चाहूल लागली आहे . आठव्या वेतन आयोगानुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये चक्क दुप्पट वाढ होणार आहे .

केंद व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगानुसार, 2.57 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे पगार दिला जात आहे . यामध्ये आता आठव्या वेतन आयोगानुसार फिटमेंट फॅक्टर 3.68 पट होण्याची शक्यता आहे . ज्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा आठव्या वेतन आयोगानुसार किमान मूळ वेतन 18 हजार रुपये वरून 26 हजार रुपये होणार आहे , तर राज्य कर्मचाऱ्यांचा विचार केला असता , सध्या सातवा वेतन आयोगानुसार किमान मूळ वेतन 15000 रुपये आहे . तर फिटमेंट फॅक्टर 3.68 पट नुसार राज्य कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन 21,100/- रुपये होईल .

सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणुका जवळ येत असल्याने , केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांना नवा वेतन आयोग लागू करण्याची मोठी चर्चा होत आहे . दर दहा वर्षांनी नवा वेतन आयोग लागू करण्यात येत असतो , यानुसार सन 2016 मध्ये केंद्र व राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला .यानुसार सन 2026 मध्ये नवा वेतन आयोग लागू करण्यात येईल .

नवा वेतन आयोग लागू करण्याच्या अनुषंगाने केंद्र सरकारकडून पे कमिशन समिती लवकरच गठित करण्यात येईल .

कर्मचारी विषयक , भरती / योजना व ताज्या अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा

Leave a Comment