Employees Da Hike : सरकारी व पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना थकित 18 महिन्यांचा महागाई भत्ता लाभ ! अखेर सरकारची मोठी घोषणा !

Spread the love

कोरोना काळांमध्ये केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा 18 महिने कालावधी करीता महागाई भत्ता गोठविण्यात आलेला होता .या कालावधीमधील थकित महागाई भत्ताचा लाभ मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे .यामुळे आता या 18 महिने कालावधी मधील थकित डी.ए फरकाची रक्कम मिळणार आहे . याकरीता केंद्र सरकारकडून निर्णय घेण्यात येणार आहे .

4% डी.ए वाढीसह मिळणार 18 महिने थकित डी.ए फरक लाभ !

केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांना जानेवारी 2023 पासून 4 टक्के डी.ए वाढीच्या प्रस्तावासोबत , 18 महिने थकित डी.ए फरकाचा लाभ प्रस्तावित आहे . डी.ए वाढीच्या निर्णयांमध्ये सदर 18 महिने डी.ए फरकाचा योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे . कर्मचाऱ्यांकडून वारंवार होणाऱ्या मागणींमुळे 18 महिने डी.ए फरकाचा लाभ देणे भाग पडणार आहे .18 महिने कालावधीमधील डी.ए फरकाबाबत योग्य तो सकारात्क निर्णय केंद्र सरकारने घ्यावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा केंद्रीय कामगार युनियन कडून देण्यात आलेला आहे .

18 महिन्यांच्या थकित महागाई भत्ता फरक –

कोविड -19 महामारीचा कालावधी जानेवारी 2020 ते जुन 2021 या 18  महिने कालावधी मध्ये केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा डी.ए वाढ गोठविण्यात आलेला होता . या कालावधीमधील थकित डी/ डीआर कर्मचाऱ्यांना अदा करणे व्यवहार्य मानले गेले नाही , यामुळे केंद्रीय सरकारी व पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना थकित डी.ए / डी.आर चा लाभ देणे अपेक्षित असल्याची बाब केंद्रीय अर्थ राज्य मंत्री पंकज चौधरी यांनी दि.21.12.2022 रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये स्पष्ट केले आहे .

यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना थकित 18 महिने कालावधी मधील डी.ए थकबाकी रक्कम मिळण्याचा मार्ग सुकर झालेला आहे .केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्यास , राज्य सरकारी / पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना देखिल 18 महीने डी.ए फरकाचा लाभ मिळणार आहे .

कर्मचारी विषयक / पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment