राज्य कर्मचाऱ्यांचे दि. 14 मार्च रोजीच्या संपाबाबत , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतून केले राज्य कर्मचाऱ्यांना मोठ्या आव्हान !

Spread the love

दिनांक 14 मार्च 2023 पासून राज्यातील 17 लाख राज्य कर्मचारी जुनी पेन्शन या प्रमुख मागणी करिता बेमुदत संपावर जाणार आहेत . यामुळे राज्यातील प्रशासन व्यवस्था विस्कळीत होईल , याकरिता राज्य कर्मचाऱ्यांनी संपावर जाऊ नये असे आव्हान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे .

दिनांक 14 मार्च 2023 पासून सुरू होणाऱ्या संपामध्ये राज्यातील जवळपास सर्वच कर्मचारी संघटनांनी पुढाकार घेतल्याने , राज्यातील प्रत्येक विभागातील सर्वच कार्यालयातून कर्मचारी संप पुकारणार आहेत . यामुळे राज्य प्रशासन व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत होईल , परिणामी प्रशासनाला व जनतेला मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल . म्हणून जुनी पेन्शन चा मुद्दा चर्चेने सोडवू , संप पुकारू नये ! असे आव्हान राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केले आहे .

प्रत्येक वेळेस कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यानंतर राज्य शासनाकडून समिती गठीत करून निर्णय घेवू , असे आश्वासन प्रत्येक वेळी कर्मचाऱ्यांना देण्यात येते . परंतु सदर आश्वासनाची पूर्तता होत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये मोठा असंतोष आहे . यामुळे जोपर्यंत जुनी पेन्शन चा मुद्दा मार्गी लागत नाही, तोपर्यंत कर्मचारी संपावर ठाम असणार आहेत , अशी भूमिका कर्मचाऱ्याकडून वर्तवली आहे .

राज्य शासनाचे सन 2023- 24 या वर्षाचे अर्थसंकल्प जाहीर झाली आहे . सदर अर्थसंकल्पामध्ये कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याची कोणतीही बाब नमूद नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये अगोदरच मोठा असंतोष आहे . यामुळे कर्मचारी दिनांक 14 मार्च 2023 पासून होणाऱ्या संपामध्ये सक्रिय भाग घेणार आहेत .

कर्मचारी विषयक भरती योजना व ताज्या अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा

Leave a Comment