राज्य कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर : 7 व्या वेतन आयोगानुसार ,सुधारित वेतन ,थकबाकी व इतर भत्ते अदा करणेबाबत GR निर्गमित ! दि.09.02.2023

Spread the love

राज्यातील खाली नमूद कर्मचाऱ्यांना आत्ताच्या घडीचा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे .तो म्हणजे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार सुधारित वेतन व थकबाकी , इतर भत्ते अदा करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक 9 फेब्रुवारी 2023 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे .

क्रीडा महर्षी प्रा. दि. ब देवधर क्रीडा प्रबोधनीचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पुणे येथील शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांचे सातवा वेतन आयोगानुसार सुधारित वेतन व अनुज्ञेय वेतनाची थकबाकी व इतर देयके अदा करण्यासाठी 2 कोटी 17 लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे . सदरचे अनुदान ज्या प्रयोजनासाठी मंजूर करण्यात आले आहे त्याच प्रयोजनासाठी खर्च करण्यात यावे असे आदेशित करण्यात आले आहे .

निधीचे खर्च करताना राज्य शासनामार्फत वेळोवेळी वित्त विषयक निर्गमित करण्यात आलेले विधी आदेश नियम शासन निर्णय वित्तीय नियमावली यांची अंमलबजावणी करून वरील वितरित तरतुदीचा विनियोग करण्याचा अधिकार राहून उपरोक्त तरतूद विधीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे .

सदर शासन निर्णयामुळे वरील नमूद कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग नुसार सुधारित वेतन थकबाकी व भत्ता चा मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे .

या संदर्भातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक 9 फेब्रुवारी 2023 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा .

शासन निर्णय

कर्मचारी विषयक पद भरती योजना व ताज्या अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा

Leave a Comment