राज्य शासनाने राज्यातील रोजंदारी / तासिका तत्वावरील कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करणेबाबतचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे .सदर रोजंदारी / तासिका तत्वावरील कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करणेबाबची यादी शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेली आहे . याबाबतचा आदिवासी विकास विभागांकडून दि.06 फेब्रुवारी 2023 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात ..
आदिवासी विकास विभागातील शासकीय आश्रमशाळांमध्ये रोजंदारी / तासिका तत्वावरील कार्यरत कर्मचाऱ्यांना मा.उच्च न्यायालयाच्या निर्णयांनुसार शासन सेवेत नियमित करण्याच्या अनुषंगाने मा. मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर केला असता याचिकेतील शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेल्या 645 कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्यात येत आहे .
आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर पदावर रोजंदारी / तासिका तत्वावर कार्यरत असलेल्या मा.न्यायालयात याचिका दाखल केली आहे , मात्र त्या याचिकांमध्ये अंतिम निर्णय झालेला नाही अशा कर्मचाऱ्यांना तसेच मा.न्यायालयात याचिका दाखल न केलेल्या अशा कर्मचाऱ्यांना मा.न्यायनिर्णयाच्या धर्तीवर नैसर्गिक न्यायाच्या तत्वानुसार त्यांची सेवा दि.01.11.2022 पासून नियमित करण्यात येत आहे .
सन 2022 च्या पहिल्या शैक्षणिक अखेरपर्यंत दि31.10.2022 पर्यंत कर्मचाऱ्यांची 10 वर्षांची सेवा होत असलेल्या कर्मचाऱ्यांना नियमितीकरण व नियमित वेतनस्तर दि.01.11.2022 पासून देय असणार आहे . नियमित वेतनस्तर अनुज्ञेय करतांना ती संबंधित पदाच्या वेतनस्तराच्या किमान टप्यावर निश्चित करण्यात येणार आहे .यामंध्ये आदिवासी विकास विभागातील ज्या कर्मचाऱ्यांची सेवा दि.31.10.2022 पर्यंत 10 वर्ष होत असतील अशा कर्मचाऱ्यांची सुधारित यादी संबंधित विभागांकडून निर्गमित करण्यात आलेली आहे .
म्हणजेच आदिवासी विकास विभागांमधील रोजंदारी / तासिका तत्त्वावर कार्यरत असणारे व ज्या कर्मचाऱ्यांची सेवा 10 वर्षे पुर्ण झालेली आहे अशा सर्वच कर्मचाऱ्यांना नियमित करण्यात येणार आहेत .शासन निर्णयामध्ये नाव नसणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुधारित यादी आपल्या संबंधित विभागस्तरावर जाहीर करण्यात आली आहे .
या संदर्भातील आदिवासी विकास विभागांकडुन दि.06.02.2023 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा .
कर्मचारी विषयक पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा
- अधिकारी / कर्मचारी वेतन व भत्ते अदा करणेबाबत दि.28.11.2023 रोजी निर्गमित झाला महत्वपुर्ण शासन निर्णय !
- राज्यातील तब्बल 17 लाख कर्मचाऱ्यांचे हिवाळी अधिवेशन काळात विधीभवनावर पेन्शन जनक्रांती महामोर्चा !
- सिबिल स्कोअर कमी असेल तर चिंता करू नका; असे घ्या त्वरित कर्ज? फॉलो करा या टिप्स-
- दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लाखो कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! वाढीव महागाई भत्त्यासोबत मिळणार या कर्मचाऱ्यांना बोनस;
- Employee Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात येणार !