सर्व राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे माहे फेब्रुवारी 2023 देय मार्च वेतनातुन इतकी वाढीव रक्कम होणार कपात ! वित्त विभागाकडून GR निर्गमित !

Spread the love

राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांचे माहे फेब्रुवारी 2023 देय मार्च वेतन अदा करताना राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेच्या बदलेल्या दरांनुसार ,कपाती करणेबाबत वित्त विभागाकडून दि.24 जानेवारी 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे .वित्त विभागाचा सदर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात ..

राज्य शासकीय कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजनेची वर्गणी व राशीभूत रक्कम यामध्ये सदर शासन निर्णयान्वये वाढ करण्यात येत आहे .यामध्ये गटनिहाय वार्षिक वर्गणी निर्धारित करण्यात येत आहे .गट अ मधील कर्मचाऱ्यांना 25 लाख रुपये राशीभूत विमा रक्कमेचा लाभासाठी वार्षिक 885/- रुपये वर्गणी करण्यात येत आहे . तसेच संवर्ग ब मधील अधिकारी / कर्मचाऱ्यांना 20 लाख रुपये राशीभूत विमा रक्कम अनुज्ञेय करण्यासाठी वार्षिक 708 /- रुपये वर्गणी कपात करण्यात येणार आहे .

तसेच संवर्ग क व संवर्ग ड मधील कर्मचाऱ्यांना 15 लाख रुपये राशीभूत विमा रक्कम लाख लाभासाठी वार्षिक 531/- रुपये रक्कम माहे फेब्रुवारी वेनातुन कपात करण्यात येणार आहे .कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजनेतील सदर सुधारणेच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक कार्यालय प्रमुखांने त्यांच्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांच्या वेतन देयकातून अपघात विमा वर्गणी माहे फेब्रुवारी 2023 देय मार्च 2023 च्या वेतनातुन व तद् नंतर दरवर्षी कपात करणे आवश्यक असणार आहे .

अपघात विमा योजना ही विमाक्षेत्रातील प्रचलित वैयक्तिक अपघात विमापत्रक असून यास विमा अधिनियम 1938 च्या कलम 64 व्हीबी च्या तरतुदींचे अनुपालन अनिवार्य आहे .या संदर्भातील राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दि.24 जानेवारी 2023 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .

शासन निर्णय

कर्मचारी विषयक / पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment