राज्य शासनाने राज्यातील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या माहे डिसेंबर 2022 च्या वेतनासाठी 223 कोटी इतका निधी वितरीत करण्याबाबत गृह विभागाकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . या संदर्भातील गृह विभागांडून दि.16.02.2023 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या माहे डिसेंबर 2022 देय जानेवारी 2023 च्या वेतनासाठी सन 2022-23 मध्ये गृह विभागाच्या 20410018 -33 अर्थसहाय्य लेखाशिर्षाखाली 223 कोटी एवढी रक्कम रोखीने प्रदान करण्यास मान्यता देण्यात येत आहे .सदर रुपये 223 कोटी हा खर्च सन 2022-23 या आर्थिक वर्षांमध्ये उपलब्ध असलेल्या तरतुदीमधून भागविण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .
सदरची निधी कर्मचाऱ्यांच्या वेतनाकरीता खर्ची टाकण्यासाठी , परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांना प्राधिकृत करण्यात येत असून , त्यांच्या कार्यालयातील आहरण व संवितरण अधिकारी असलेले लेखाधिकारी यांनी सदर रक्कम आहरित करुन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास अदा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून माहे डिसेंबर 2022 देय जानेवारी 2023 चे वेतन अदा करण्यासाठी निधी उपलब्ध करण्यात यावा अशी मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली होती , सदर मागणींच्या अनुषंगाने निधी वितरीत करण्यात आली आहे .
या संदर्भातील गह विभागाचा दि.16.02.2023 रोजीचा सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .
कर्मचारी विषयक / पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा
- Employee Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात येणार !
- Employee Shasan Nirnay : राज्य कर्मचाऱ्यांसाठी दोन महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित , पाहा सविस्तर शासन निर्णय !
- Old Pension : राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत न्यायालयाने राज्य सरकारला दिले निर्देश !
- एलआयसीच्या जीवन लाभ योजनेमध्ये फक्त 253 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा 54 लाख रुपयांचा परतावा!
- वेतन , अतिकालिक भत्ता , महागाई भत्ता व वेतनावरील बाबींकरीता अनुदान वितरीत करणेबाबत शासन निर्णय निर्गमित !