राज्यातील जिल्हा परिषदा , नगरपरिषदा , नगरपालिका , कटकमंडळे , महानगरपालिका तसेच मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक शाळांमध्ये शासन निर्णय दि.10.03.2000 नुसार शिक्षण सेवक योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे .सदर शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करणेबाबतचा शालेय शिक्षण व क्रिडा विभागाकडुन दि.07.02.2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
यानुसार मंत्रीमंडळाने दि.22.12.2022 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षण सेवकांचे मानधनात वाढ करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे . यानुसार प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षकांना सध्या 6000 ऐवढे मानधन मिळते होते यामध्ये 10 हजार रुपये वाढ केल्याने आता या शिक्षण सेवकांना 16,000/- प्रतिमहा मानधन मिळणार आहे .
तसेच माध्यमिक शिक्षण सेवकांना 8,000/- रुपये मानधन मिळते होते , यामध्ये 10 हजार रुपये वाढ केले असून आता यांना 18,000/- रुपये दराने मानधन मिळणार आहे .त्याचबरोबर उच्च माध्यमिक / कनिष्ठ महाविद्यालय शिक्षण सेवकांना यापुर्वी 9,000/- रुपये मानधन मिळत होते ,आता 20,000/- रुपये प्रतीमहा मानधन मिळणार आहे .
शिक्षण सेवकांना सदर निर्णयातील वाढ ही दि.01 जानेवारी 2023 पासून लागू होणार आहे .यासंदर्भातील शालेय शिक्षण व क्रिडा विभागाकडुन दि.07.02.2023 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा .
कर्मचारी विषयक , पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीत Whatsapp ग्रुप मध्ये जॉईन व्हा
- Employee Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात येणार !
- Employee Shasan Nirnay : राज्य कर्मचाऱ्यांसाठी दोन महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित , पाहा सविस्तर शासन निर्णय !
- Old Pension : राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत न्यायालयाने राज्य सरकारला दिले निर्देश !
- एलआयसीच्या जीवन लाभ योजनेमध्ये फक्त 253 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा 54 लाख रुपयांचा परतावा!
- वेतन , अतिकालिक भत्ता , महागाई भत्ता व वेतनावरील बाबींकरीता अनुदान वितरीत करणेबाबत शासन निर्णय निर्गमित !