अखेर राज्य कर्मचाऱ्यांची बेमुद संपाची तारिख झाली निश्चित ! असे होणार आंदोलन !

Spread the love

महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील सर्व अकृषी विद्यापीठे व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विविध मागणींसाठी दि.02.02.2023 पासुन संपावर जात आहेत .या संपामध्ये राज्यातील मुंबई विद्यापीठातील कार्यरत कर्मचारी देखिल सहभागी होणार आहेत .दि.02.02.2023 पासूननच कर्मचाऱ्यांनी परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार टाकले आहेत .

सध्या विद्यापठामध्ये M.COM ,LLB तसेच इंजिनिअरींच्या परीक्षा सुरु असून , या परीक्षच्या संबंधित कोणतीही कामे न करण्याचा निर्णय सदर कर्मचाऱ्यांनी घेतला आहे .हे आंदोलन महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समिती मार्फत आयोजित करण्यात आलेले आहेत .

यामध्ये कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना पूर्ववत लागू करणे , 7 वा वेतन आयोग तरतुदींप्रमाणे लाभाच्या अनुज्ञेय योजना लागु करणे , रिक्त पदे भरणे , इत्यादी मागणींसाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघाचे अध्यक्ष श्री .अभय राणे यांनी दिली आहे .

असे असणार आंदोलनांची रुपरेषा –

दि.14 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 ते 2.30 या वेळेत निदर्शने करणे , त्यानंतर दि.15 फेब्रुवारी रोजी काळ्या फिती लावून कर्मचारी काम करणार आहेत .तर दि.16 फेब्रुवारी रोजी एक दिवस संप पुकारण्यात येणार आहेत .तर दि.20 फेब्रुवारी 2023 रोजी बेमुदत संप पुकारण्यात येणार आहेत .

सरकारी कर्मचारी विषयक , पदभरती / योजना व ताज्या अपडेटकरीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा .

Leave a Comment