आता राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावीच लागणार ! 14 मार्चपासून शासकीय कामकाज होणार पूर्णपणे ठप्प !

Spread the love

जुनी पेन्शन योजना या प्रमुख मागणीसाठी राज्यातील सुमारे 17 लाख शासकीय निमशासकीय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी दिनांक 14 मार्चपासून बेमुदत संपावर जात आहेत . यामुळे राज्य शासनाचे शासकीय कामकाज पूर्णपणे बंद राहणार आहे .जुनी पेन्शन या प्रमुख मागणीसाठी राज्य कर्मचाऱ्यांकडून पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेण्यात येत आहे.

बेमुदत संप करणे बाबत राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनांची एकत्रित बैठक दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी पार पडली आहे सदर बैठकीमध्ये बेमुदत संप करण्याचे आयोजन करण्यात आले आहे .राज्य कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन बाबत मागणीवर वारंवार दुर्लक्ष होत असल्याने कर्मचाऱ्यांकडून शासकीय कामकाज बंद करून संपावर जाण्याचे ठरवले आहे .

जुनी पेन्शन व नवीन पेन्शन योजनेमधील फरक

जुनी पेन्शन योजना नोव्हेंबर 2005 पासूनच लागू करून नवीन पेन्शन योजना व जुनी पेन्शन योजना यामधील फरक कर्मचाऱ्यांना अदा करण्यात यावा .त्याचबरोबर नवीन पेन्शन योजनेमधील जमा रकमेवर आठ टक्के व्याजाने रक्कम परत करण्यात यावी यामधील राज्य सरकारची योगदान कपात करून कर्मचारी योगदान राज्य कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये वर्ग करण्यात यावा . अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे

राज्य कर्मचाऱ्यांकडून शासकीय कामकाज बंद करून संपावर जाण्याचे ठरवले असल्याने , राज्य शासनाची मोठी कोंडी होणार आहे . यामुळे राज्य सरकारला जुनी पेन्शन लवकरच लागू करावी लागेल .

कर्मचारी विषयक भरती योजना व ताज्या अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा

Leave a Comment