गुरुवार दि.09.02.2023 रोजी मुंबईत , बेलार्ड इस्टेट येथे सरकारी – निमसरकारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समितीच्या घटक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची तातडीची सभा पार पडली . सांप्रत राज्य शासनाने कर्मचारी शिक्षकांच्या रास्त मागण्यांकडे सतत दुर्लक्ष केल्यामुळे शासनाप्रती सर्वदू महाराष्ट्रात कर्मचारी – शिक्षकांचा संताप अनावर झाला आहे . अशा भावना उपस्थित कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या .
कर्मचाऱ्यांचा सर्वात जिव्हाळ्याची व भविष्यातील सुरक्षतेची हमी असलेल्या जुन्या पेन्शन योजनेची पुनर्स्थापना करा या मागणीने संपूर्ण महाराष्ट्रात विशिष्ट वादळ निर्माण केले आहे . या मागणीबाबत कर्मचाऱ्यांनी आंदोलने करुन वेळोवेळी शासनाचा लक्षवेध करुन घेण्याचा प्रयत्न केला परंतु राज्य शासनाने काही अधांतरी माहीतीची विधाने करुन वेळ मारुन नेल्याचे दिसून आले . त्यामुळे NPS हटविण्याबाबत शासनाची सध्या नकारात्मकता दिसून येते आहे .
दि.09.02.2023 रोजी पार पडलेल्या समन्वय समितीच्या बैठकीत बेमुदत संप करण्यासंदर्भात मंजूर झालेल्या ठरावावर जिल्हानिहाय चर्चा झाली व राज्यव्यापी बेमुदत संप करण्याबाबतचा ठरावास एकमताने मंजुरी दिली .
राज्यभरातील सर्व शासकीय , जिल्हा परिषद व इतर पात्र कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी दि.14 मार्च 2023 पासून बेमुदत संपावर जातील अशी घोषणा समन्वय समितीचे निमंत्रक श्री. विश्वास काटकर यांनी केली .या राज्यव्यापी संपामध्ये राज्यातील तब्बल 17 लाख कर्मचारी सहभाग घेणार असल्याने , राज्य शासनाला यावर सकारात्मक निर्णय घ्यावा लागणार आहे .
कर्मचारी विषयक / पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा
- अधिकारी / कर्मचारी वेतन व भत्ते अदा करणेबाबत दि.28.11.2023 रोजी निर्गमित झाला महत्वपुर्ण शासन निर्णय !
- राज्यातील तब्बल 17 लाख कर्मचाऱ्यांचे हिवाळी अधिवेशन काळात विधीभवनावर पेन्शन जनक्रांती महामोर्चा !
- सिबिल स्कोअर कमी असेल तर चिंता करू नका; असे घ्या त्वरित कर्ज? फॉलो करा या टिप्स-
- दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लाखो कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! वाढीव महागाई भत्त्यासोबत मिळणार या कर्मचाऱ्यांना बोनस;
- Employee Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात येणार !