जुनी पेन्शनसाठी राज्यातील 60 शासकीय कर्मचारी संघटनांचा एकत्रिक आंदोलनाची हाक ! कर्मचाऱ्यांचा आक्रमक पवित्रा !

Spread the love

महाराष्ट्र राज्य शासन सेवेत दि.01.11.2005 नंतर रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन ( Old Pension ) योजना लागू व्हावी अशी कर्मचाऱ्यांची बऱ्याच दिवसांपासूनच मागणी आहे .देशांमध्ये राज्य सरकारकडून हळूहळू जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येत आहेत , परंतु महाराष्ट्र राज्य सरकारकडून केवळ आश्वासनेच दिली जात आहेत .यावर कोणताही तोडगा निघत नसल्याचे चित्र दिसून येत असल्याने आता कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे .

राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करुन जुनी पेन्शन योजना लागु करावी याकरीता राज्यातील तब्बल 60 शासकीय कर्मचारी संघटनांनी एकत्र येवून , आंदोलनाची हाक दिली आहे .राज्यातील जिल्हा परिषद कर्मचारी युनियन , महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक वर्गीय संघटना , राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेस संलग्न संघटना अशा विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या तब्बल 60 कर्मचारी संघटना आपल्या हक्कासाठी एकत्र येवून पुढील महिन्यामध्ये बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती समोर येत आहे .

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांनी दिलेल्या आश्वासनानुसार राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करणेबाबत अभ्यास समिती स्थापन करण्यात आलेली आहे . परंतु यावर तात्काळ कोणताही निर्णय होत नसल्याने कर्मचाऱ्यांकडून संपाचे आयोजन करण्यात आलेले आहेत .

जुनी पेन्शनकरीता राज्यातील सर्व संघटना एकत्र येवून आपल्या न्याय अधिकारासाठी लढणार असल्याची माहीती संघटनेचे कार्याध्यक्ष प्राजक्त झावरे पाटील यांनी सांगितले .यामुळे आता राज्य सरकारला कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करावीच लागणार आहे .

कर्मचारी विषयक / पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment