GR : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना बचत निधीच्या लाभ प्रदानाबाबत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! दि.31.01.2023

Spread the love

राज्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना लागु केलेल्या गट विमा योजनेच्या बचत निधीच्या लाभ प्रदानाचे परिगणितीय तक्ते बाबत ग्राम विकास विभागाकडुन अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे . या संदर्भातील ग्राम विकास विभागाकडुन दि.31 जानेवारी 2023 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .

राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना 1982 अंतर्गत दि.01 जानेवारी 2022 ते दि.31 डिसेंबर 2022 या कालावधीत गट विमा योजनेचे सदस्यत्व संपुष्टात येणाऱ्या राज्य शासकीय कर्मचारी व अधिकारी यांना मिळणाऱ्या बचत निधीच्या लाभ्ज्ञाचे परिगणितीय तक्ते निर्गमित केलेले आहेत .त्यास अनुसरुन सन 2022 या वर्षात सदस्यत्व संपुष्टात येणाऱ्या / आलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या परिगणितीय तक्त्यानुसार 2022 या वर्षात गट विमा योजनेचे सदस्यत्व संपष्टात येणाऱ्या / आलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना शासन निर्णयात परिगणतिय तक्ते नमुद करण्यात आलेले आहेत .

सर्व जिल्हा जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दि.01 जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत राजीनामा / सेवानिवृत्त / सेवेत असताना मृत्यु पावल्याने व इतर काही कारणाने ज्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे गट विमा योजनेचे सभासदत्व संपुष्टात येईल त्या कर्मचाऱ्यांना / त्यांच्या वारसांना या निर्णयातील परिगणितीय तक्त्यानुसार देय होणारी बचत निधीची रक्कम देण्याची कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत .

त्याचबरोबर शासन पुढे असेही आदेश देत आहे कि , जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेल्या गट विमा योजनेतील तरतुदीनुसार बचत निधीमधील रकमेवर दि.01 जानेवारी 2022 पासून दरसाल दरशेकडा 7.1 टक्के दराने व्याज आकारण्यात येणार आहे .जिल्हा परिषद कर्मचारी गट विमा योजना 1990 च्या विमा निधीमधील संचित रक्कमांवर 4 टक्के दरात कोणताही बदल झाला नसल्याने याच दरात विमा निधीमधील संचित रकमांवर व्याजाची आकारणी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .

या संदर्भाती सविस्तर शासन निर्णय व परिगणितीय तक्ते पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करुन GR डाऊनलोड करा .

शासन निर्णय

कर्मचारी विषयक , पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment