राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची एक मोठी खुशखबर समोर आलेली आहे , ती म्हणजे माहे फेब्रुवारी महिन्यांच्या वेतनासोबत सातवा वेतन आयोगाचे उर्वरित सर्व हप्ते अदा करणेबाबत शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक मुंबई संचालकाकडून दि.14.02.2023 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . या संदर्भातील सविस्तर शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहुयात .
सदर परिपत्रकातील नमुद संदर्भानुसार शासनाकडून उपलब्ध झालेल्या तरतुदीनुसार व दिनांक 10.02.2023 रोजी बैठकीमध्ये घेतलेल्या आढाव्यानुसार पुढील लेखाशीर्षामध्ये माहे फेब्रुवारी 2023 च्या वेतन व सातवा वेतन आयेागाचा राहीलेला पहिला , दुसरा हप्ता तसेच तिसऱ्या हप्त्यासाठी पुरेशी तरतुद उपलब्ध असल्याने , माहे फेब्रुवारी 2023 चे वेतन देयकामध्ये लेखाशीर्ष 22020558 , 220 H 953 , 22021948 , 22020576 , 22020549 , 22020531 ची देयके ऑनलाईन महागाई भत्तासह व सातव्या वेतन आयोगाचा पहिला ,दुसरा व तिसरा हप्ता देयके अदा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .
त्याचबरोबर दि.10.02.2023 रोजीच्या बैठकील आढाव्यनुसार सातव्या वेतन आयोगाचे हप्ते ऑनलाईन काढणे पर्याप्त तरतुदीअभावी शक्य नसल्या कारणाने फक्त फेब्रुवारी 2023 नियमित वेतन देयक व महागाई भत्त्याच्या फरकासह प्राधान्याने सर्व कर्मचाऱ्यांचे नियमित वेतन काढण्यात यावे असा आदेश देण्यात आलेला आहे .त्यानंतर उर्वरित रकमेतून सातव्या वेतन आयोगाचे हप्ते शिक्षण विभाग शासन निर्णय दि.01.02.2023 नुसार ऑफलाईन काढण्याची कार्यवाही करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत .
तदनंतर शालार्थ प्रणालींमध्ये नोंद घेवून , उपलब्ध तरतुद 100 टक्के खर्च होईल याची दक्षता घेण्याच्या सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत .या संदर्भातील शिक्षण संचालनालय मार्फत निर्गमित झालेला सविस्तर परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहू शकता .

कर्मचारी विषयक / पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा
- Employee Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात येणार !
- Employee Shasan Nirnay : राज्य कर्मचाऱ्यांसाठी दोन महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित , पाहा सविस्तर शासन निर्णय !
- Old Pension : राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत न्यायालयाने राज्य सरकारला दिले निर्देश !
- एलआयसीच्या जीवन लाभ योजनेमध्ये फक्त 253 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा 54 लाख रुपयांचा परतावा!
- वेतन , अतिकालिक भत्ता , महागाई भत्ता व वेतनावरील बाबींकरीता अनुदान वितरीत करणेबाबत शासन निर्णय निर्गमित !