मुंबई : राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणेबाबत , मंत्रालयीन हालचाली !

Spread the love

राज्य शासन सेवेतील कर्मऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणेबाबत , राज्य शासनाकडून कोणत्या हालचाली आहेत , याबाबतची माहिती समोर आलेली आहे . सध्या जुनी पेन्शन हा मुद्दा राज्यातच नव्हे तर देशांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे .सन 2004 नंतर रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना परत जुनी पेन्शन योजना लागु करावी अशी कर्मचाऱ्यांची मोठी मागणी सरकारपुढे करण्यात येत आहेत . त्याचबरोबर नो पेन्शन नो वोट असा नारा कर्मचाऱ्यांकडून देण्यात येत आहे .

त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या दुसरी मोठी मागणी म्हणजे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करावी .केंद्र सरकार व इतर 25 राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे केले आहेत , त्याच धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वरुन 60 वर्ष करणेबाबत राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे . यावर राज्य शासनाकडून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही .

महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणेबाबत , राज्यातील विविध कर्मचारी संघटनांकडून वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहेत .जेणेकरुन कर्मचाऱ्यांना दोन वर्षांची अतिरिक्त सेवेचा लाभ मिळेल .

यावर राज्य शासनाकडून प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे , परंतु या प्रस्तावाला विरोध झाल्याने सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणेबाबतचा प्रस्ताव अद्याप पर्यंत प्रलंबिल आहे .शिवाय राज्याचे उप सचिव यांनी देखिल विरोध दर्शविला होता , यामुळे प्रस्ताव असाच प्रलंबित राहीला आहे .सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणे राज्यातील कर्मचाऱ्यांचे हिताचे असून , केंद्र सरकारप्रमाणे लाभ मिळणे आवश्यक आहे , असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे .

कर्मचारी विषयक / पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment