राज्य शासन सेवेतील एखाद्या कर्मचाऱ्यांने पदोन्नती नाकारल्यास अशा प्रकरणांमध्ये कशा प्रकारे कार्यवाही करावी याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून दि.12.09.2016 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .या संदर्भातील सामान्य प्रशासन विभागाकडून निर्गमित झालेला सविस्तर GR पुढीलप्रमाणे पाहुयात .
अशा प्रकारणांमध्ये वरच्या संवर्गात पदोन्नतीसाठी निवड झाल्यानंतर किंवा त्यापुर्वीच एखाद्या कर्मचाऱ्यांने पदान्नतीचे पद स्विकारण्यासाठी नकार दर्शविल्यास त्याचे नाव हे पदान्नतीसाठी पात्र असणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या निवड यादीतून काढून टाकण्यात येईल . तर आगामी दोन वर्षी होणाऱ्या निवड सूचींमध्ये सदर कर्मचाऱ्यांच्या नावाचा विचार केला जाणार नाही तर तिसऱ्या वर्षी निवडसूचीत पात्रता तपासण्यात येवून त्यावेळेच्या गुणवत्तेप्रमाणे पदोन्नतीसाठी पात्र ठरल्यास त्याचा नियमित निवडसूचींमध्ये समावेश करण्यात येईल .
ज्या अधिकारी / कर्मचाऱ्यांने कायमस्वरुपी पदोन्नती नाकारली असेल अशा अधिकारी / कर्मचाऱ्यांचा पुढील कोणत्याही निवडसूचीकरीता विचार करण्यात येणार नाही .तसेच ज्या अधिकारी / कर्मचारी यांचा पहिल्या वेळेस पदोन्नती नाकारल्यानंतर तीन वर्षांच्या नंतर दुसऱ्या वेळी पदोन्नतीकरीता पाठ ठरले मात्र सदर कर्मचाऱ्यांने दुसऱ्यावेळी देखिल पदान्नतीकरीता नकार दिल्यास त्या कर्मचाऱ्याचा निवडसूचीत व पुढील वर्षाच्या निवडसूचीत विचार करण्यात येणार नाही .याप्रमाणे पुढील प्रत्येक वेळेस वरीलप्रमाणे योग्य ती कार्यवाही करण्यात येईल .
पदोन्नतीस नकार दिलेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांमुळे रिक्त झालेल्या किंवा रिक्त होणाऱ्या पदावर संबंधित कर्मचाऱ्यांच्या प्रवर्गानुसार / ज्येष्ठतानुसार पात्र ठरणाऱ्या कनिष्ठ अधिकारी / कर्मचाऱ्यांचा निवडसूचीत समावेश करण्यात येईल .
पदोन्नतीस नकार दिलेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना आश्वासति प्रगती योजना लाभ अनुज्ञेय केला असल्यास ते काढून घेण्यात येईल .पदोन्नती नाकारल्यास उद्भवणारे सर्व तरतुदी पाहण्यासाठी सामान्य प्रशासनांकडून दि.12.09.2016 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लि करा .
कर्मचारी विषयक / पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा
- Employee Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात येणार !
- Employee Shasan Nirnay : राज्य कर्मचाऱ्यांसाठी दोन महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित , पाहा सविस्तर शासन निर्णय !
- Old Pension : राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत न्यायालयाने राज्य सरकारला दिले निर्देश !
- एलआयसीच्या जीवन लाभ योजनेमध्ये फक्त 253 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा 54 लाख रुपयांचा परतावा!
- वेतन , अतिकालिक भत्ता , महागाई भत्ता व वेतनावरील बाबींकरीता अनुदान वितरीत करणेबाबत शासन निर्णय निर्गमित !