मोठी आनंदाची बातमी : राज्य शासनाने घेतला कर्मचारी हिताचा अत्यंत मोठा दिलासादायक निर्णय ! GR दि.07.02.2023

Spread the love

महाराष्ट्र राज्य शासनाने अखेर कर्मचारी हिताचा अत्यंत मोठा दिलासादायक महत्वपुर्ण निर्णय घेतला असून , याबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभागाकडुन दि.07 फेब्रुवारी 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . यामध्ये राज्यातील खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वाढीव मानधन लागु करणेबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे .

राज्यातील खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रथम नियुक्तीपासून पहील्या तीन वर्षांसाठी लागु करण्यात येणाऱ्या मानधनांमध्ये वाढ करण्यास राज्य शासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे . यामध्ये ग्रंथपाल पदासाठी 14,000/- प्रयोगशाळा सहाय्यक पदासाठी 12,000/- कनिष्ठ लिपिक पदासाठी 10,000/- तर चतुर्थ श्रेणी कर्मचारी पदांकरीता 8,000/- रुपये प्रतिमहा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे .

शालेय शिक्षण व क्रिडा विभागाच्या शासन निर्णय दि.11.12.2020 नुसार चतुर्थश्रेणी कर्मचारी नियम वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यानंतर सदर पद व्यपगत करणेबाबत निर्णय विचारात घेण्यात आलेला आहे . सदर निर्णयानुसार चतुर्थश्रेणी पदाऐवजी शिपाई भत्ता लागू करण्यात आलेला आहे .परंतु अनुकंपा तत्वावर चतुर्थ श्रेणी पदावर नियुक्ती होणाऱ्या कर्मचाऱ्यांना नियमित वेतनश्रेणी लागु होणार आहे .

सदरचे मानधन हे दि.01 जानेवारी 2023 पासून प्रत्यक्ष लागू होणार आहे . याकरीता येणारा खर्च हा मंजूर अनूदानातून भागविचे आदेश राज्य शासनाकडुन देण्यात आलेले आहेत .या संदर्भातील शालेय शिक्षण व क्रिडा विभागाकडुन दि.07.02.2023 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा .

शासन निर्णय

कर्मचारी विषयक पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा .

Leave a Comment