Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी राज्यातील कर्मचारी झाले आक्रमक ! शेवटी घेतला हा निर्णय !

Spread the love

Old Pension Scheme : मागील काही दिवसांपासून पेन्शन योजनेबाबत उलथापालक झालेली आपल्याला दिसून येत आहे. राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांकडून आता अशी मागणी घातली जात आहे की नवीन पेन्शन योजना ही रद्द करून सरसकट सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ द्या. अशी मागणी राज्यभरातील कर्मचारी अगदी जोरात धरून आक्रमक झाले आहेत. हिवाळी अधिवेशन झाले त्या कालखंडात या मागणीने सर्वाधिक जोर धरलेला होता. 2022 डिसेंबर महिन्यातील झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये याच विषयावर नागपूर विधान भवनात चर्चा झालेली आपल्याला दिसून आली.

राज्य सरकारच्या माध्यमातून या विषयावर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी नागपूरच्या विधान भवनामध्ये हिवाळी अधिवेशन मध्ये जुनी पेन्शन योजनेबाबत राज्यभरातील कर्मचाऱ्यांना लागू केली जाणार नाही असे मत व्यक्त केले होते. मात्र हा निर्णय घेतल्यानंतर एक महिन्यांनी उपमुख्यमंत्र्यांचे सूर बदललेले दिसून आले. विधान परिषदेच्या निवडणुकी च्या कालखंडामध्ये प्रचार करत असताना देवेंद्र फडणवीस यांनी ओ पी एस योजना लागू केली जाईल. याबाबत त्यांनी सकारात्मकता दर्शवली होती.

परंतु विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजप पक्षाला एकूण पाच जागांपैकी फक्त एका जागेवरच विजय मिळवता आला. जुनी पेन्शन योजनेचा जो काही मुद्दा होता त्या मुद्द्यांमुळे भाजपला धक्का बसला आहे. असे तज्ञ लोकांनी व्यक्त केले. दरम्यानच्या काळात आता जुनी पेन्शन योजना ही अत्यंत तीव्र झालेली असून 14 मार्चपासूनच महाराष्ट्र राज्यातील 17 लाख कर्मचाऱ्यांनी आम्ही संपावर जाऊ असा निर्णय घेतला असून आता अहमदनगर जिल्ह्यामधून ह्याच जुन्या पेन्शन योजनेबाबत तीव्र आक्रमण झालेले दिसून येत आहे.

एकंदरीत बघितले तर 14 मार्चपासून सुरू होणाऱ्या बेमुदत नियोजनामुळे काम बंद आंदोलनात आता शिक्षक वर्ग जिल्हा परिषद शिक्षकेतर संघटना कृषी संघटना ग्रामसेवक महसूल इत्यादी दिसून येतील. या माध्यमातून आता शासनाच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत. जर वेळोवेळी शासनाने याबाबतचा निर्णय काढला नाही तर आंदोलन तीव्र होऊ शकते. आम्ही तुम्हाला आजच्या लेखाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की. 2005 नंतर जे नागरिक राजकीय सेवेत रुजू झाले होते अशा नागरिकांना जुनी पेन्शन योजना आकारले जाणार नाही अशा नागरिकांना नवीन पेन्शन योजनेचा लाभ देण्यात येईल.

मात्र मित्रांनो नवीन पेन्शन योजनेमध्ये कित्येक दोष आपल्याला आढळून आले आहेत. त्यामुळे कर्मचारी या योजनेचा विरोध करत आहेत. ओ पी एस म्हणजे जुनी पेन्शन योजना आता राज्यभरातील कर्मचाऱ्यांना मिळेल की नाही असा प्रश्न पडत आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्यात नव्हे तर देशभरातील इतर राज्यांमध्ये देखील नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी याबाबत नागरिक आक्रमक झालेले आहेत. यामध्ये राजस्थान, पंजाब, हिमाचल प्रदेश, झारखंड अशा राज्यांचा समावेश आहे.

Leave a Comment