राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करणेबाबत 14 मार्चपुर्वीच निर्णय होणार ! राज्य शासनाकडून जुनी पेन्शन व पर्यायी आंध्र प्रदेश सरकारची गॅरंटेड पेन्शन योजनेचा अभ्यास सुरु !

Spread the love

सध्या राज्यातील तब्बल 17 लाख शासकीय / निमशासकीय व इतर पात्र कर्मचारी त्याचबरोबर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचारी येत्या 14 मार्च रोजी राज्यव्यापी संपावर जाणार आहेत .संपावर जाण्याचे प्रमुख कारण म्हणजे राज्यातील कर्मचाऱ्यांना तात्काळ जुनी पेन्शनचा लाभ अनुज्ञेय करुन , जुनी पेन्शनचे सर्व लाभ सन 2005 पासुन पुर्ववत लागु करण्यात यावेत .

राज्य कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी महासंप –

राज्य कर्मचाऱ्यांचा येत्या 14 मार्च रोजी महासंपच होणार आहे , कारण जुनी पेन्शन या मुद्द्यावर राज्यातील सर्वच कर्मचारी एकजुट झालेले आहेत .देशांमध्ये राजस्थान , पंजाब , हिमाचल प्रदेश , छत्तीसगढ , उडीसा , पश्चिम बंगाल यासारखे राज्य NPS पेन्शन योजना रद्द करुन परत जुनी पेन्शन योजना स्विकारत आहेत .तर दुसरीकडे महाराष्ट्र राज्यासारखे आर्थिक दृष्ट्या प्रगत असणाऱ्या राज्यांमध्ये अद्याप पर्यंत कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करण्यात आलेली नाही .

देशांमध्ये आमदार / खासदार यांना केवळ पाच वर्षााच्या कालावधीसाठी निवडूण आल्यास , आयुष्यभर पेन्शनचा लाभ मिळतो . तर याऊलट आयुष्यभर देशांची सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मात्र नविन पेन्शन प्रमाणे तुटपुंजी राशी पेन्शन म्हणुन मिळते .

जुनी पेन्शन बाबत महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयीन हालचाली – नुकतेच रत्नागिरी येथे पार पडलेल्या शिक्षक अधिवेशनांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री बोलत असताना सांगितले कि ,राज्य कर्मचाऱ्यांना लवकरच जुनी पेन्शन बहाल करण्यात येईल .जुनी पेन्शन बहाल करण्याकरीता मंत्रालयीन स्तरावर सध्या अभ्यास समिती गठित करण्यात आलेली आहे .सदर समिती आपला अहवाल दि.04.03.2023 पर्यंत राज्य शासनाला सादर करण्याची शक्यता आहे .

सदर समितीकडून ज्या राज्य सरकारने जुनी पेन्शन योजना लागु केली आहे अशा राज्य सरकारच्या जुनी पेन्शनचा तसेच आंध्र प्रदेश राज्य सरकारने लागु केलेली गॅरंटेड पेन्शन योजना अशा दोन्ही योजनांचा अभ्यास करण्यात येत आहेत .

कर्मचारी विषयक / पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment