मुंबई : 14 मार्च 2023 पासून राज्यभरातील शासकीय कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती मिळाली असून आता याविषयी राज्य शासनाला राज्य शासकीय कर्मचारी मध्यवर्ती संघटना यांनी नोटीस पाठवलेले आहे. सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मुख्य मागणी सर्व कर्मचाऱ्यांची आहे. राज्यभरातील शासकीय, निमशासकीय, शिक्षक यासोबतच शिक्षक अंतर्गत कर्मचारी यंदा 14 मार्च 2023 पासून बेमुदत संपावर जातील.
जे नागरिक 2005 पासून शासकीय सेवेमध्ये रुजू झाले आहेत अशा शासकीय कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने जुनी पेन्शन योजना देण्याचे नाकारले आहे आणि नवीन पेन्शन योजना त्यांच्यासाठी लागू केली आहे. पण आता राज्यभरातील सर्व कर्मचारी शासनासमोर अशी मागणी करत आहेत की त्वरित जुनी पेन्शन योजना लागू करून नवीन पेन्शन योजना रद्द करावी. या मागणी पोटी शासकीय कर्मचारी आता पुढील महिन्यात बेमुदत संपावर जातील.
यासोबतच मित्रांनो अकर्मक झालेले राज्यभारातील शासकीय कर्मचारी मध्यवर्ती संघटना यांनी आज मंत्रालयात एक नोटीस जाहीर केले आहे. नोटीस मध्ये त्यांनी अशी मागणी मांडली आहे की, आम्ही 14 मार्च 2023 पासून बेमुदत संपावर जाऊ. त्यामुळे त्वरित जुनी पेन्शन योजना लागू करावी. अमरावती मधील पदवीधर मतदार संघामधील यासोबतच नागपूरमधील शिक्षक मतदार संघातील निवडणुकीमध्ये आता पराभव पत्करल्यानंतर राज्यातील नवीन सरकार शिंदे फडणवीस सरकार यांच्यामध्ये जुनी पेन्शन योजना याचे वाद्य वाजत आहे…
शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या काय काय आहेत चला पाहूया ?
राज्य शासनाने जुनी पेन्शन योजना ही पूर्वीप्रमाणे लागू करावी यासोबतच नवीन पेन्शन योजना रद्द करून टाकावी.
कॉन्ट्रॅक्टवर असलेल्या कामगारांना यासोबतच योजनेच्या कामगारांना प्रदीर्घकाळ सेवेमध्ये असल्यामुळे खास त्यांच्यासाठी किमान वेतन द्यावी आणि त्यांच्या सर्व काही सेवा नियमित करावेत.
रिक्त असलेली सर्व पदे त्वरित भरावीत यासोबतच वाहनचालक शासकीय कर्मचाऱ्यांच्या पदाच्या भरतीसाठी जो काही मज्जाव केलेला होता तो तत्काळ हटवावा.
अनुकंपा अंतर्गत तत्त्वावरील नियुक्त हे विनाशर्त करावे यासोबतच कोरोना काळखंडामधील जे शासकीय कर्मचारी मृत पावले असतील त्यांच्या विहित वयोमर्यादीमध्ये सूट द्यावी.
जे काही अनुषंगिक भत्ते असतील ते केंद्र सामान च्या माध्यमातून मंजूर करावीत.
शिक्षकांच्या व सेवानिवृत्त शिक्षकांच्या सेवेचे प्रश्नही तात्काळ सोडवून घ्यावे.
यासोबतच निवृत्तीचे वय हे किमान साठ वर्षे करावी…
कर्मचारी विषयक / भरती / योजना व ताज्या अपडेट करीता Whatsapp groups मध्ये सामील व्हा
- अधिकारी / कर्मचारी वेतन व भत्ते अदा करणेबाबत दि.28.11.2023 रोजी निर्गमित झाला महत्वपुर्ण शासन निर्णय !
- राज्यातील तब्बल 17 लाख कर्मचाऱ्यांचे हिवाळी अधिवेशन काळात विधीभवनावर पेन्शन जनक्रांती महामोर्चा !
- सिबिल स्कोअर कमी असेल तर चिंता करू नका; असे घ्या त्वरित कर्ज? फॉलो करा या टिप्स-
- दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लाखो कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! वाढीव महागाई भत्त्यासोबत मिळणार या कर्मचाऱ्यांना बोनस;
- Employee Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात येणार !