मोठी खुशखबर : केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना देखील मिळणार हा वाढीव लाभ ! पगारात होणार मोठी वाढ !

Spread the love

राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव लाभ मिळणार आहे . यामुळे कर्मचाऱ्यांचे पगारांमध्ये मोठी वाढ होणार आहे . नुकतेच केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासून महागाई भत्ता मध्ये 4% वाढ करणे बाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे .

केंद्र सरकारने यापूर्वी जानेवारी 2023 पासून तीन टक्के डी ए वाढ करण्याचा विचार केला होता . परंतु ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकांचे आकडेवारी जाहीर झाल्याने महागाई भत्त्यामध्ये चार टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . सदरचा वाढीव महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यापासून रोखीने अदा करण्यात येणार आहे . यासोबत जानेवारी व फेब्रुवारी महिन्यातील DA थकबाकीचा देखील लाभ अनुज्ञेय करण्यात येणार आहे .

केंद्र सरकारच्या याच धर्तीवर राज्य शासन सेवेतील शासकीय, जिल्हा परिषदा , इतर पात्र कर्मचाऱ्यांना त्याचबरोबर निवृत्तीवेतनधारकांना माहे जानेवारी 2023 पासून चार टक्के डीए वाढ करणे बाबत राज्य शासनाकडून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल . सातव्या वेतन आयोगानुसार राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर डीए वाढ करण्यात येते , यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना जानेवारी 2023 पासून चार टक्के महागाई भत्ता चा लाभ मिळणार आहे .

सध्या कर्मचाऱ्यांना जुलै 2022 पासून 38% दराने मिळत आहे , हा वाढीव 4% DA वाढीमुळे केंद्र व राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 42 % वर जावून पोहोचेल .

याबाबत केंद्र सरकारने अधिकृत घोषणा केली असून , होळी सणापुर्वीच कर्मचाऱ्यांना पगारात मोठी वाढ मिळणार आहे .4% DA वाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात किमान 1500/- रुपये ते 5500/- रुपये पर्यंत वाढ होईल .

कर्मचारी विषयक ,पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट साठी Whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा .

Leave a Comment