राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी : माहे मार्च महिन्यांच्या वेतनापासून मिळणार 42% दराने महागाई भत्ता !

Spread the love

राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे , ती म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये माहे मार्च महिन्यांच्या वेतनापासून वाढ होणार आहे .सध्या केंद्र सरकारने याबाबत अधिकृत्त निर्णय घेतलेला असून , होळी सणाच्या दिवशी घोषणा करण्यात येणार आहे .केंद्र सरकारने डी.ए वाढीची घोषणा केल्यानंतर , लगेचच राज्य कर्मचाऱ्यांना डी.ए वाढ मिळणार आहे .

माहे जानेवारी पासून मिळणार वाढीव डी.ए –

सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षांतुन दोन वेळा एक जानेवारी व दुसरा जुलै महिन्यांमध्ये डी.ए वाढ करण्यात येते . कर्मचाऱ्यांना जानेवारी 2023 ची डी.ए अद्याप बाकी असल्याने , माहे जानेवारी 2023 पासून केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे .सध्या कर्मचाऱ्यांना 38 टक्के प्रमाणे डी.ए मिळत आहे , यामध्ये 4 टक्के वाढ झाल्यास एकुण महागाई भत्ता हा 42 टक्के दराने मिळणार आहे .

केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून जाहीर केलेल्या ग्राहक निर्देशांकानुसार सदरची वाढ केंद्र सरकारकडूनच निश्चित करण्यात आलेली आहे . यामुळे कर्मचाऱ्यांना वाढीव डी.ए हा जानेवारी 2023 पासून फरकाच्या रक्कमेसह वाढीव दराने डी.ए लाभ मिळणार आहे .यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची प्रलंबित डी.ए वाढ अखेर मार्गी लागणार आहे .

4 टक्के महागाई भत्ता वाढल्यास वेतनामध्ये 1500/- रुपये ते 15 हजार रुपये पर्यंत वाढ होईल . सदराचा वाढीव डी.ए बाबतचा अधिकृत्त निर्णय केंद्राकडून होळी सणापुर्वी घेण्यात येईल , तर केंद्र सरकारच्या निर्णयानंतर मार्च महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यात डी.ए वाढीबाबत अधिकृत्त निर्णय घेण्यात येईल .

कर्मचारी विषयक / पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment