राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर ! जानेवारी पासून महागाई भत्ता ( DA ) मध्ये 3% नाही तर इतक्या टक्यांनी वाढणार ! आकडेवारी जाहीर !

Spread the love

राज्य कर्मचाऱ्यांना लवकरच महागाई भत्ता मध्ये मोठी वाढ मिळणार आहे , केंद्रीय कामगार युनियन कडुन AICPI चे निर्देशांक माहे जानेवार पर्यंत जाहीर झालेले आहेत . यापुर्वी केंद्रीय कामगार मंत्रालयाकडुन माहे डिसेंबर महिन्याच्या निर्देशांकाच्या आधारे महागाई भत्ता मध्ये 3 टक्के वाढ निश्चित करण्यात आलेली होती .

परंतु कर्मचाऱ्यांना डी.ए वाढ जानेवारी महिन्यांपासून लगेच लागु न केल्याने , आता जानेवारी महिन्यांच्या निर्देशांकाच्या आधारे महागाई भत्ता वाढ निश्चित होणार आहे . AICPI ( ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक ) माहे सप्‍टेंबर महिन्यांपासूनच चढता आलेख दिसत आहे .आता माहे जानेवारी महिन्यांमध्ये भारताच्य स्टॉक मार्केटवर झालेला विपरित परिणामांमुळे AICPI मध्ये मोठी वाढ होणार आहे .

AICPI चे निर्देशांक दि.31.01.2023 पर्यंत विचारात घेतले असता , केंद्रीय / राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये 4.35 टक्के वाढ होणे अपेक्षित आहे . म्हणजेच सरासरी डी.ए 4 टक्के वाढ होणार आहे . या अगोदर केंद्रीय कामगार मंत्रालयाने जाहीर केल्यानुसार डी.ए मध्ये 3 टक्के वाढ निश्चित करण्यात आली होती . तर आता नविन आकडेवारीनुसार आता कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये 4 टक्के वाढ होणार आहे .

सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्रीय व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे , यामध्ये आणखीण चार टक्के वाढ झाल्यास केंद्रीय / राज्य कर्मचाऱ्यांचा एकुण महागाई भत्ता 42 टक्के होईल .

कर्मचारी विषयक / पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment