राज्य कर्मचाऱ्यांची देखिल DA वाढीची प्रतिक्षा संपली , 18 महिने डी.ए थकबाकी देण्याचाही विचार !

Spread the love

सरकारी कर्मचाऱ्यांना ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकानुसार महागाई भत्तामध्ये 4 टक्के वाढ अपेक्षित आहे . जानेवारी 2023 सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये वाढ करणे केंद्र व राज्य सरकारच्या विचाराधीन आहे .निवडणुका जवळ आल्याने , केंद्र सरकारच्या डी.ए वाढीच्या निर्णयानंतर राज्य सरकार लगेच निर्णय घेण्यात येईल .

ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आकडेवारीमध्ये मोठी वाढ झालेली असून , या वाढीनुसार केंद्र सरकारने सदर आकडेवारीचा विचार करुन केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये 4 टक्के वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे .केंद्र शासनाच्या याच धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासुन डी.ए मध्ये आणखीण चार टक्के वाढ करण्यात येईल .सध्या केंद्र व राजय कर्मचाऱ्यांना एकुण 38 टक्के दराने महागाई भत्ता मिळतो , चार टक्के डी.ए वाढ झाल्यास एकुण महागाई भत्ता हा 42 टक्के होईल .

केंद्रीय कर्मचाऱ्यांना कोरोना काळातील 18 महिने डी.ए अदा करणेबाबत , केंद्रीय स्तरावर मोठी चर्चा सुरु आहे .या 18 महिने काळातील डी.ए थकबाकी लागु केल्यास , राज्य कर्मचाऱ्यांना देखिल 18 महिने काळातील डी.ए थकबाकीचा लाभ अनुज्ञेय करण्यात येणार आहे .

याबाबतचा निर्णय होळी सणापुर्वीच घेण्यात येणार असल्याची माहीती समोर येत आहे . यामुळे केंद्र व राज्य शासनातील सर्व शासकीय कर्मचारी व निवृत्तीवेतनधारकांना डी.ए वाढीमुळे पगारात मोठी वाढ होणार आहे .

कर्मचारी विषयक , पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment