खुशखबर ! राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी पासुन महागाई भत्ता मध्ये आणखीन 3% वाढ ! वित्त विभागाकडुन अर्थसंकल्पामध्ये तरतुद !

Spread the love

राज्यातील शासकीय , जिल्हा परिषद तसेच इतर पुर्ण कालिन कर्मचारी व सेवानिवृत्ती पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 आणखीण तीन टक्के डी.ए वाढ होणार आहे .याकरीता येत्या महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये विशेष तरतुद करण्यात येणार आहे .

राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी डी.ए वाढ ही केंद्र सरकारने घोषित केल्याप्रमाणे तीन टक्के वाढ होणार आहे .याकरीता राज्य शासनाकडून आवश्यक असणारी निधींची तरतुद राज्याचे 2023-24 या करीताच्या अर्थसंकल्पामध्ये नमुद करण्यात येणार आहे .यामुळे राज्यातील सर्व पात्र कर्मचाऱ्यांचा एकुण महागाई भत्ता हा 41 टक्के होणार आहे .

वित्त विभागाकडुन प्रस्ताव – राज्याचे अर्थसंकल्प सादर करण्याच्या अगोदरच सर्व विभागाकडुन सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरीता आवश्यक निधींची तरतुद करण्याकरीता मागणी सादर करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत . यामध्ये वित्त विभागाकडून राज्य कर्मचाऱ्यांना डी.ए वाढ लागु करण्याकरीता आवश्यक निधीबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे .

राज्य शासनाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन दि.27 फेब्रुवारी 2023 पासुन सुरुवात होणार आहे .अर्थसंकल्पामध्ये विशेष आवश्यक तरतुदींसाठी वित्त विभागाने जनतेकडुन अपेक्षा नोंदविण्याकरीता आव्हान करण्यात आले आहेत .

सरकारी कर्मचारी विषयक / पदभरती , योजना व ताज्या बातम्यांच्या अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment