Good News : केंद्राप्रमाणे राज्यातील कर्मचाऱ्यांना 4% DA वाढीबाबत वित्त विभागांकडून प्रस्ताव तयार !

Spread the love

राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव महागाई भत्ता सह 18 महिने कालावधीमधील डी.ए अदा करण्यात येणार आहे . सध्या केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये माहे जानेवारी 2023 पासून आणखीण चार टक्के वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आलेला आहे .

केंद्र सरकारच्या याच धर्तीवर राज्य  सरकारकडून महागाई भत्ता जानेवारी 2023 पासून वाढ करणेबाबत वित्त विभागांकडून प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे . त्याचबरोबर केंद्र सरकारने जर मागिल 18 महिेने कालावधीमधील डी.ए थकबाकी लागु केल्यास , राज्य सरकारकडून देखिल लागू करण्यात येणार आहे . याकरीता राज्य शासनाच्या वित्त विभागांकडून तसा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे .

महागाई भत्ता मध्ये 4 टक्के वाढ -राज्यातील कर्मचाऱ्यांना डी.ए वाढीचा लाभ नेहमीच केंद्र सरकारने लागु केल्यास , त्यानंतर उशिरानेच लागु करण्यात येते . सध्या केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये 4 टक्के वाढ करण्याची मोठी घोषणा केल्याने , राज्य कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये वाढ करणे बाबत राज्य शासनाच्या वित्त विभागांकडून प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे .

सध्या राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2022 पासून 38 टक्के दराने महागाई भत्ता लागु करण्यात आलेला आहे , आता यामध्ये वाढ करुन माहे जानेवारी 2023 पासून 42 टक्के दराने महागाई भत्ता लागु करण्यात येणार आहे .

कर्मचारी विषयक / पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment