होळी सणाच्या मुहुर्तावर राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार , 42 टक्के दराने महागाई भत्ता ! प्रस्ताव तयारीचे वित्त विभागाला निर्देश !

Spread the love

राज्य शासन सेवेतील शासकीय , जिल्हा परिषदा व इतर पुर्णकालिक कर्मचारी त्याचबरोबर सेवानिवृत्त पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना येत्या होळी सणाच्या औचित्य साधून राज्य सरकार महागाई भत्ता वाढीची मोठी भेट देण्याच्या तयारीत आहे .सध्या राज्यांमध्येच नव्हे तर संपुर्ण देशांमध्ये जुनी पेन्शन या मागणीकरीता कर्मचाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात आंदोलने / संप करण्यात येत आहेत .

केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासुन महागाई भत्ता मध्ये आणखीण चार टक्के वाढ निर्धारित केल्याने आता केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासून एकूण 42 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे . याच धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना तात्काळ महागाई भत्ता वाढ मिळावी याकरीता कर्मचारी संघटनांकडून निवेदने देण्यात आलेले आहेत .

सध्या कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने डी.ए मिळत असून 4 टक्के डी.ए वाढीमुळे जानेवारी महिन्यांपासूनची डी.ए थकबाकीसह वाढीव महागाई भत्ताचा लाभ अनुज्ञेय करण्यात येईल .येत्या 8 मार्चला होळी सण असल्याने सणाचे औचित्य साधून राज्य सरकार कर्मचाऱ्यांची नाराजगी दुर करण्यासाठी डी.ए वाढीबाबत मोठा दिलासादायक निर्णय घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे .

राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडून वित्त विभागाला डी.ए वाढीबाबत सुचना देण्यात आलेल्या असून वित्त विभागांकडून प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहिती मिडीया रिपोर्टनुसार समोर आलेली आहे . 4% डी.ए वाढीमुळे कर्मचारी / पेन्शनधारकांना वेतन / पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे .

कर्मचारी विषयक / पदभरती / येाजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रूपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment