राज्य शासन सेवेतील अधिकारी / कर्मचाऱ्यांचे वय वर्षे 50/55 वर्ष पुर्ण झाल्यास , अशा अधिकारी / कर्मचाऱ्यांचे सेवेत रहाण्याची पात्रापात्रता आजमिण्याची तरतुद करण्यात आलेली आहे . सदर तरतुदीनुसार अकार्यक्षम अधिकारी / कर्मचाऱ्यांना लोकहिताच्या दृष्टीने मुदतपुर्व सेवानिृत्ती देण्यात येते .
राज्य शासन सेवेतील माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील गट अ व गट ब मधील अधिकाऱ्यांची वयाच्या 50/55 व्या वर्षापलिकडे सेवेत रहाण्याची पात्रापात्रता अजमाविण्याकरीता विभागीय पुनर्विलोकन समितीची स्थापना करणेबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून दि.20.02.2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर समितीमध्ये सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचित अध्यक्ष असणार आहेत .तर माहीती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक या समितीमध्ये सदस्य असणार आहेत . तसेच श्री.मोरये अवर सचिव सामान्य प्रशासन विभाग मागासवर्गीयांचे प्रतिनिधी म्हणुन सदस्य घेण्यात आलेले आहेत . तर सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव हे सदर समितीमध्ये सदस्य सचिव असणार आहेत .
सदरची समिती माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील गट अ व गट ब मधील अधिकाऱ्यांची वयाच्या 50/55 व्या वर्षापलिकडे सेवेत रहाण्याची पात्रापात्रता अजमाविण्याकरीता पुनर्विलोकन करणार आहेत .या संदर्भातील सा.प्र.विभागाकडून दि.20.02.2023 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .
कर्मचारी विषयक /पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा
- अधिकारी / कर्मचारी वेतन व भत्ते अदा करणेबाबत दि.28.11.2023 रोजी निर्गमित झाला महत्वपुर्ण शासन निर्णय !
- राज्यातील तब्बल 17 लाख कर्मचाऱ्यांचे हिवाळी अधिवेशन काळात विधीभवनावर पेन्शन जनक्रांती महामोर्चा !
- सिबिल स्कोअर कमी असेल तर चिंता करू नका; असे घ्या त्वरित कर्ज? फॉलो करा या टिप्स-
- दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लाखो कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! वाढीव महागाई भत्त्यासोबत मिळणार या कर्मचाऱ्यांना बोनस;
- Employee Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात येणार !