Good News : राज्य कर्मचाऱ्यांना पेन्शन लाभ देण्याबाबतचा निर्णय अंतिम टप्यात !

Spread the love

राज्य शासन सेवेतील शासकीय , जिल्हा परिषदा व इतर पात्र कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर फमिली पेन्शन व ग्रॅजुएटी लाभ देण्याबाबतची मोठी घोषणा हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री यांनी केली होती .याबाबत राज्य सरकारकडून सखोल चर्चा करण्यात आलेली असून , निर्णय हा अंतिम टप्यात आहे .

दि.09 व 10 फेब्रुवारी 2023 रोजी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनांचे शिष्टमंडळाने राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये कुटुंब निवृत्तीवेतन व ग्रॅज्युएटी देणेसंदर्भात सविस्तर चर्चा झाली आहे . यावेळी राज्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले कि , केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना कुटुंब निवृत्तीयोजनेचा लाभ देण्याबाबतची सर्व प्रक्रिया पुर्ण झालेली असून , निर्णय हा अंतिम टप्यात आहे .

तसेच कुटुंब निवृत्ती वेतन व ग्रॅज्युएटी बाबतची फाईल पुर्ण झालेली असून , CMO कार्यालयामध्ये पाठविण्यात आलेली आहे .त्याचबरोबर याबाबतची CMO कार्यालयाशी विचारणा केली असता ,याबाबतचा प्रस्ताव कॅबिनेट मध्ये घेण्याकरीता नोटशीत तयार झाली असल्याची माहिती समोर आलेली आहे .

यामुळे याबाबतचा अधिकृत्त अधिसूचना लवकरच निर्गमित करण्यात येणार आहे . कुटुंब निवृत्ती वेतन व ग्रॅज्युएटीचा लाभ हा राज्य कर्मचाऱ्यांना सन नोव्हेंबर 2005 पासूनच लागू करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे ,असे झाल्यास कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे .

कर्मचारी विषयक पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment