DA फरक , सातवा वेतन आयोगाचे हप्ते व वेतनाकरीता आवश्यक निधींचे वितरण करणेबाबत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.06.02.2023

Spread the love

राज्य शासन सेवेतील शालेय शिक्षण व क्रिडा विभाग अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता फरक सातवा वेतन आयोगाचे हप्ते इत्यादी थकित देयके अदा करण्यासाठी राज्य शासनाकडुन निधींचे वितरण करण्यात आलेले आहेत . याबाबत राज्य शासनांकडुन निधींचे वितरण करणेबाबत शासन निर्णय दि.06.02.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .

वित्त विभागाकडुन अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी यांना वितरीत करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती यानुसार सन 2022-23 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रिडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभाागाडून BEAMS प्रणालीवर प्राप्त झालेला निधी नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधिनस्त ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे .

वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांचे देयके मंजुर करण्यास्तव वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय / शासन परिपत्रक यामधील विहीत सुचना  / अटी तसेच मुंबई वित्तीय अधिनियम , 1959 मधील परिशिष्ट -26 मधील तरतुदी विचारात घेवून संबंधितांना अनुज्ञेय असणाऱ्या किमान रक्कमेच्या मर्यादेतच घरबांधणी अग्रिम वितरीत करण्यात यावेत असे आदेश देण्यात आलेले आहेत .

तसेच अनुदान ज्या उद्देशासाठी देण्यात आलेला आहे त्याच लेखाशिर्षाखाली खर्च करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे . अन्यथा वित्तिय अनियमितता समजण्यात येईल . यामध्ये कर्मचाऱ्यांचे महागाई भत्ता फरक , सातवा वेतन आयोगाचे उर्वरित हप्ते , वैद्यकीय देयके व वेतन याकरीता निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे . लेखाशिर्षनिहाय निधींची उपलब्धता पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करुन सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करा .

शासन निर्णय

कर्मचारी विषयक / पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment