राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु न करता नविन पेन्शन योजनेतच , करण्यात आले महत्वपुर्ण दिलासादायक बदल !

Spread the love

राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना सरसकट लागु केल्यास , अचानक आर्थिक बोजामध्ये वाढ होईल . यामुळे राज्य सरकारकडुन हळूहळू नविन पेन्शन योजनेमध्ये बदल केला जात आहे .जेणेकरुन राज्‍यावर अचानक मोठा आर्थिक भार येणार नाही .राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या मागणींचा विचार करुन नविन पेन्शन योजनेंमध्ये महत्वपुर्ण बदल करण्यात आलेला आहे .

नविन पेन्शन योजनेंमध्ये जुनी पेन्शन योजनेप्रमाणे कुटुंब निवृत्तीवेतन योजनेचा समावेश करण्याचे प्रस्तावित आहे . याप्रस्तावित बाबींवर राज्य सरकारने मोठा महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे . सन 2005 पासूनचा सदरचा कुटुंबनिवृत्तीवेतनाचा लाभ अनुज्ञेय करण्यात येणार आहे .शासन सेवेत असतानाच अधिकारी / कर्मचाऱ्यांचा मृत्यु झाल्यास , कुटुंबातील वारसांना जुन्या पेन्शप्रमाणे कुटुंबनिवृत्तीवेतनाचा लाभ मिळणार आहे .

केंद्र सरकारच्या नविन पेन्शन योजनेच्या धोरणानुसार कुटुंब निवृत्तीवेतन योजनेचा लाभ अनुज्ञेय आहे . याच केंद्र सरकारच्या धर्तीवर सदरचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे .राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन आहे . यावर राज्य सरकारकडुन अभ्यास समिती गठीत करण्यात आलेली असून , याबाबतचा अधिकृत निर्णय राज्याच्या सन 2023-24 च्या अर्थसंकल्पामध्ये होण्याची शक्यता आहे .

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करणार असल्याचे सकारात्मक वक्तव्य विधानपरिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केले असल्याने , राज्य सरकारकडुन लवकरच याबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे .

कर्मचारी विषयक / पदभरती , योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment