मोठी खुशखबर :  राज्य कर्मचाऱ्यांना तब्बल 58 महिन्याची थकबाकी लाभ मिळणार , राज्य मंत्रीमंडळाने घेतला मोठा निर्णय !

Spread the love

राज्य शासनाने बक्षी समिती खंड – 2 अहवाल स्विकारुन , अहवालातील सुधारित वेतनश्रेणी लागु करण्यात आलेली आहे .सदर सुधारित वेतनश्रेणी ह्या सातव्या वेतन आयोगातील असल्याने , राज्यातील कर्मचाऱ्यांना सदरचा सुधारित वेतनश्रेणीचा लाभ सन 2016 पासुन अनुज्ञेय करण्यात येणार आहे .यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणीनुसार वेतन थकबाकीचा मोठा लाभ मिळणार आहे .

राज्य शासनाने राज्यातील तब्बल 104 संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोागनुसार वेतनत्रुटी दुर करुन सदर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागु करण्यात आलेल्या आहेत .या बाबत राज्य शासनाच्या वित्त विभागांकडून दि.13.02.2023 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर निर्णयांमध्ये विभाग व पदांनुसार सुधारित वेतनश्रेणी नमुद करण्यात आलेल्या आहेत .

सदर शासन निर्णयांमध्ये राज्यातील अनेक विभागातील कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणींमधील सुधारणा करण्याबाबत राज्य शासनाने सहमत असल्याचे नमुद करण्यात आलेले होते . सदर शासन निर्णय हा सन 2016 पासूनच पुर्वलक्षी प्रभावाने लागु केला असल्याने , कर्मचाऱ्यांना तब्बल 58 महिन्यांची वेतन थकबाकी मिळणार आहे .

58 महीन्यांची वेतन थकबाकी बाबत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे ट्टिट –

राज्यातील कृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन अकृषी विद्यापीठ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे सुधारित वेतनश्रेणीनुसार 58 महिन्यांची थकबाकी देणेबाबत राज्य सरकार अनुकुलता दर्शविली असून सुधारित वेतनश्रेणी 2016 पासुन लागु करण्यात आलेली आहे .याबाबत राज्यातील अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल राज्याचे मुख्यंमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे चंद्रकांत पाटील यांनी आभार मानले आहे .

बक्षी समिती खंड -2 मधील सुधारणा करण्यात आलेल्या सर्वच संवर्गातील कर्मचाऱ्यांना 58 महिन्यांची वेतन थकबाकीचा लाभ मिळणार आहे .सदर थकबाकी ही टप्याटप्याने अदा करण्यात येणार आहे . यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ प्राप्त होणार आहे .

कर्मचारी विषयक / शासकीय पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment