शालेय शिक्षण विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांतील गट क व गट ड मधील पदांवर विभागीय पदोन्नती समितीची रचना करणे व पदोन्नतीची प्रक्रिया दरवर्षी विहीत वेळेत पार पाडण्यासाठी कालमर्यादेचे पालन करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडुन अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे .
शालेय शिक्षण विभागाच्या अनिधनस्त सर्व क्षेत्रीय कार्यालयांमधील गट क व गट ड मधील पदांवर पदोन्नती देण्याकरीता प्रस्ताव तपासून , पात्र व्यक्तींची पदोन्नतीसाठी शिफारस पदांवर करण्यासाठी सामान्य प्र.वि.शासन निर्णय दि.01.08.2019 मध्ये नमुद केल्यानुसार विभागीय पदोन्नती समिती गठीत करण्यात आली आहे .
सा.प्र.विभागाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचना विचारात घेवून पदोन्नतीची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याकरीता शासन निर्णयामध्ये , कालमर्यादा निश्चित करण्यात आल्या आहेत .
शालेय शिक्षण विभागाच्या अधिनस्त कार्यालयांमधील गट क व गट ड मधील कर्मचाऱ्यांच्या सर्व सेवाविषयक बाबींची प्रलंबित कामे व सर्व कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तक / सेवापट यांमधील नोंदी दि.30 एप्रिल 2023 पूर्वी विशेष मोहिम राबवून अद्ययावत अथवा पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .
आयुक्त शिक्षण यांचे कार्यालयातील आस्थापनाविषयक बाबी हाताळणारे सहसंचालक व सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी या संदर्भातील शालेय शिक्षण विभागाकडुन दि.01.02.2023 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा .
कर्मचारी विषयक , सरकारी पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा
- Employee Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात येणार !
- Employee Shasan Nirnay : राज्य कर्मचाऱ्यांसाठी दोन महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित , पाहा सविस्तर शासन निर्णय !
- Old Pension : राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत न्यायालयाने राज्य सरकारला दिले निर्देश !
- एलआयसीच्या जीवन लाभ योजनेमध्ये फक्त 253 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा 54 लाख रुपयांचा परतावा!
- वेतन , अतिकालिक भत्ता , महागाई भत्ता व वेतनावरील बाबींकरीता अनुदान वितरीत करणेबाबत शासन निर्णय निर्गमित !